Vrusha's Kitchen

  • Home
  • Vrusha's Kitchen

Vrusha's Kitchen नमस्कार मत्रिणींनो / मित्रांनो,
सर्वा?

08/01/2026
08/01/2026


साहित्य:
स्ट्रॉबेरी – 2 कप
साखर – 3/4 कप
लिंबाचा रस – 1 ते 1½ चमचा

कृती:
* स्ट्रॉबेरी नीट धुवून घ्या.
* देठ कापून घ्या.
* एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्या.
(जॅम गुळगुळीत हवा असेल तर थोडं मॅश करा.)
* कट केलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये साखर घाला आणि 20–30 मिनिटे बाजूला झाकून ठेवा.

टीप: त्यामुळे रस सुटतो आणि जॅम पटकन बनतो.

* पॅनमध्ये स्ट्रॉबेरी आणि साखरेचे मिश्रण घाला.
* गॅस मध्यम ते कमी आचेवर ठेवून हळू हळू ढवळत राहा.
* लिंबाचा रस घाला.
* हळू हळू जॅम घट्ट होईल.
* जॅम चमच्याला चिटकू लागला कि तयार आहे!

असे टेस्ट करून बघा:
थंड प्लेटवर थेंब टाका → पसरला नाही तर जॅम perfect तयार झाला आहे.

स्टोरेज / Storage:

* जॅम थंड होऊ द्या.
* स्वच्छ, कोरड्या काचेच्या बॉटलमध्ये भरा.
* नंतर फ्रीजमध्ये ठेवा.
* 2–3 आठवडे आरामात टिकतो.

✨ टिप्स:
* खूप घट्ट झाला तर – थोडंसं गरम पाणी घालून परत उकळा.
* खूप पातळ राहिला तर – आणखी 3–4 मिनिटं शिजवा.
* रंग टिकवायला — नेहमी कमी आचेवर शिजवा.

व्हिडीओ बघितल्याबद्दल Thank You!

  31st Vibes!!!Last night of the year 2025!Memories Loading...
05/01/2026


31st Vibes!!!
Last night of the year 2025!
Memories Loading...

03/01/2026

चहा मसाला ☕

साहित्य:
* वेलची - 1/2 कप
* काळीमिरी - 2 tbsp
* दालचिनी - 1 इंचाच्या 4-5 sticks
* लवंग - 2 tbsp
* जायफळ - 1
* सुंठ - 1/2 कप किंवा वाटी

कृती:
* वेलची मंद गॅस वर भाजून घ्या.
* त्यानंतर काळीमिरी, दालचिनी आणि लवंग मंद आचेवर भाजून घ्या.
* जायफळ खलबत्यामध्ये कुटून बारीक करून घ्यावे.
* सुंठ पण अश्याच प्रकारे खलबत्यामध्ये बारीक करून घ्यावे.
* वेलची, काळीमिरी, दालचिनी आणि लवंग थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यामधे काढून त्यामध्ये बारीक केलेले जायफळ आणि सुंठ घालून मसाल्याची पावडर करून घेणे.

मस्त कडक चहा मसाला तयार..
आता बघूया हा मसाला चहा मध्ये कधी टाकायचा?
तर जेव्हा दूध घालतो त्यानंतर हा मसाला घालायचा.. कारण आधी घातल्यास मसाल्याची तितकी चव येत नाही.
चहा मध्ये मसाला घातल्यावर ५ मिनिटे चहा शिजवून घ्यायचा.
मस्त कडक, मसालेदार चहा तयार! ☕☕

साहित्य:* किसलेले गाजर - २ कप * दूध - ३ कप * साखर - अर्धा ते ३/४ कप (चवीप्रमाणे)* तूप - २ चमचे * वेलची पावडर - चिमूटभर *...
31/12/2025

साहित्य:
* किसलेले गाजर - २ कप
* दूध - ३ कप
* साखर - अर्धा ते ३/४ कप (चवीप्रमाणे)
* तूप - २ चमचे
* वेलची पावडर - चिमूटभर
* मीठ - चिमूटभर
* खवा / मावा २ tbsp - इच्छेप्रमाणे पण चव छान होते
* काजू, बदाम, मनुका - आवडीनुसार

कृती:
* गाजर किसून घ्या. जाड किसणीवर किसले तर टेक्स्चर छान येते.
* कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर टाका आणि 5–7 मिनिटे परतून घ्या (कच्चा वास जाईपर्यंत).
* आता दूध घाला, ढवळा आणि मंद ते मध्यम आचेवर झाकण न लावता उकळू द्या. नंतर झाकण ठेवून शिजवून घ्या आणि दूध कमी होत जाईपर्यंत अधूनमधून ढवळत रहा.
* दूध आटेपर्यंत घट्ट झाले की साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण पुन्हा सैल होते, मग पुन्हा हलवा घट्ट होईपर्यंत हलवत रहा.
* आता खवा घालून 4–5 मिनिटे परता.
* वेलदोडा पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
* इच्छेप्रमाणे शेवटी 1 चमचा तूप टाकून हलवा चमकदार व घट्ट होईपर्यंत परता.

मस्त, गरमागरम गाजर हलवा तयार! एकदा करून बघाच.

गाजर हलवा:साहित्य:* किसलेले गाजर - २ कप * दूध - ३ कप * साखर - अर्धा ते ३/४ कप (चवीप्रमाणे)* तूप - २ चमचे * वेलची पावडर -...
29/12/2025

गाजर हलवा:

साहित्य:

* किसलेले गाजर - २ कप
* दूध - ३ कप
* साखर - अर्धा ते ३/४ कप (चवीप्रमाणे)
* तूप - २ चमचे
* वेलची पावडर - चिमूटभर
* मीठ - चिमूटभर
* खवा / मावा २ tbsp - इच्छेप्रमाणे पण चव छान होते
* काजू, बदाम, मनुका - आवडीनुसार

कृती:

* गाजर किसून घ्या. जाड किसणीवर किसले तर टेक्स्चर छान येते.
* कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर टाका आणि 5–7 मिनिटे परतून घ्या (कच्चा वास जाईपर्यंत).
* आता दूध घाला, ढवळा आणि मंद ते मध्यम आचेवर झाकण न लावता उकळू द्या. नंतर झाकण ठेवून शिजवून घ्या आणि दूध कमी होत जाईपर्यंत अधूनमधून ढवळत रहा.
* दूध आटेपर्यंत घट्ट झाले की साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण पुन्हा सैल होते, मग पुन्हा हलवा घट्ट होईपर्यंत हलवत रहा.
* आता खवा घालून 4–5 मिनिटे परता.
* वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
* इच्छेप्रमाणे शेवटी 1 चमचा तूप टाकून हलवा चमकदार व घट्ट होईपर्यंत परता.

मस्त, 😍😋😋गरमागरम गाजर हलवा तयार! एकदा करून बघाच.

चमचमीत अंडा करी आणि झटपट सुकट fry ,😋😋
15/02/2025

चमचमीत अंडा करी आणि झटपट सुकट fry ,😋😋

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrusha's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vrusha's Kitchen:

  • Want your business to be the top-listed Home Improvement Business?

Share