08/08/2025
नारळी भात बनवण्यासाठी लागणार साहित्य..:
बासमती तांदूळ – १ वाटी
पाणी – २ वाटी
साजूक तूप – ४ चमचे
खवणलेला ताजा नारळ – १ वाटी
गुळ – १ वाटी (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
८–९ लवंग
वेलदोड्याची पावडर – १/२ चमचा
केशर – थोडं ( 2 चमचे गरम दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा)
काजू व बदाम ,पिस्ता – थोडेसे, तुपात भाजून
थोडे मनुके
मीठ – एक चिमूट
▪️ तांदूळ धुवून २०-३० मिनिटे तसेच भिजत ठेवायचे
▪️कुकर मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यात लवंग परतून घ्यायची लवंग चांगली फुलली की त्यात भिजवलेले तांदूळ थोडेसे परतून घ्या.
▪️त्यात २ कप पाणी आणि चिमूटभर मीठ घालून झाकण लावून कूकरच्या 3 किंवा ४ शिट्या करून भात शिजवून घ्यावा .
तांदूळ तुपात परतल्याने आणि आधी भिजवून ठेवल्याने खमंग आणि मोकळा शिजला जातो (कोणताही गोड पदार्थ करताना किंचित मीठ घालावं पदार्थाची गोडी वाढते)
▪️आता कढईमध्ये उरलेलं 2 चमचे तूप गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता मनुका खरपूस परतून बाजूला काढून ठेवायचे.
▪️त्याच तुपात गुळ आणि खवणलेला नारळ परतून घ्यायचा, मध्यम आचेवर गुळ विरघळेपर्यंत गुळ खोबऱ्याचे मिश्रण परतून घ्यायचे..
मिश्रण तयार होते तोपर्यंत कूकरच्या 3 शिट्या झाल्यावर भात एका ताटात काढून थंड करून घ्यायचा.
▪️नंतर त्यात वेलदोड्याची पूड, केशराचं दूध/पाणी, शिजलेला तांदूळ,घालायचा छान मिक्स करून घ्यायचा त्यानंतर तुपात परतलेले dryfruits घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे.
▪️झाकण ठेवून २ मिनिटामध्ये मंद आचेवर वाफ येऊ द्यायची.
२ मिन नंतर पुन्हा पुन्हा एकदा भात हलवून घ्यायचा
आणि पुन्हा २–३ मिन मंद आचेवर वाफ येऊ द्यायची.
▪️आपला नारळी भात झाला की🤩 आता गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवून ठेवावा म्हणजे तो चांगला मुरतो.
तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने करता ते comment मध्ये नक्की सांगा.. हां....
🥥 नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा💐!!
सोनाली कुलकर्णी
She Plans Dinner
#नारळीपौर्णिमा #रक्षाबंधन2025 #रेसिपी