10/06/2023
आर्किटेक्चर क्षेत्रात चांगल्या करियरच्या अनेक संधी : माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे
रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथील अंतरंग २०२३ प्रदर्शनाचे उद्घाटन
नगर : आर्किटेक्चर क्षेत्रात चांगल्या करियरच्या अनेक संधी आहेत. भारतीय स्थापत्य शास्त्र जगभरात नावाजले जाते. विद्यार्थ्यांनी अशा स्थापत्यशास्त्राचा प्रत्यक्षपणे भेटी देऊन अभ्यास करावा. रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुळे नगरसारख्या तुलनेने ग्रामीण भागात आर्किटेक्चर शिकण्याची चांगली सोय उपलब्ध झाली आहे. येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट मध्ये कल्पकता, आधुनिकता व भविष्याचा वेध घेण्याचा दृष्टीकोन पहायला मिळतो. भारतात सध्या खूप स्मार्ट सिटी तयार होत आहेत.अशावेळी आर्किटेक्चर क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या कॉलेज मधून ठसा उमटवणारे आर्किटेक्चर तयार होतील असा विश्वास नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तसेच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला.
आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्याथ्यांसाठी रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर एक सुवर्णसंधी घेऊन आलेले आहे. दि. ९ ते १२ जून या कालावधीत बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंतरंग २०२३ या कलाकृतींचे, स्थापत्य शास्त्रातील विविध नमुने याचे प्रदर्शन सीड.सी. बिल्डिंग आय.एम.एस. कॅम्पस, स्टेशन रोड, अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी सी.ए.रमेश फिरोदिया, सौ. सविता रमेश फिरोदिया, मर्चंटस बॅंकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत, संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद कोलते,आय एम एसचे संचालक डॉ.एम.बी.मेहता,प्राचार्य आर्किटेक्चर सुहास चौधरी, श्रीगोपाल धूत, राजेश झंवर, अशोक मुथा, मोहनलाल मानधना, सी.ए. आर. एस.बोरा, डॉ. रवींद्र साताळकर, संतोष डुंगरवाल, ऐसाचे अध्यक्ष अन्वर शेख, क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुथा, संकेत पादीर, प्रदीप तांदळे, आय आय आय चे सदस्य चंद्रकांत तागड, सौ.वैशाली कोलते, अशोक (बाबूशेठ) बोरा, संपतलाल मुथियान, डॉ.विक्रम बार्नबस, प्रा. मीरा कुलकर्णी , डॉ. वसंत कटारिया, इंजिनिअर धनेश मुनोत, संतोष गांधी, राजू गांधी आदी उपस्थित होते.
प्राचार्य आर्किटेक्चर सुहास चौधरी यांनी स्वागत करताना प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
मॅनेजिंग ट्रस्टी सी.ए. रमेश फिरोदिया म्हणाले की,चार दिवस चालणारे हे प्रदर्शन १२ वी सायन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे. तसेच आर्किटेक्चर क्षेत्रासंबंधी कुतूहल असणाऱ्यांसाठी एक पर्वणी
आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची या क्षेत्रात होणारी प्रगती लोकांसमोर सादर करता येईल व यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्याचा पुढील वाटचालीस फायदा होणार आहे. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मागील विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.
प्रदर्शन सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वानसाठी खुले आहे.पूर्वी अहमदनगर मधील विद्यार्थ्यांचा आर्किटेक्चर क्षेत्रात जागरूकता करिअर करण्याचा ओघ कमीच होता कारण शहरामधील शहरातील या आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद, पुणे, नाशिक या ठिकाणी जावे लागत असे व त्यामध्ये त्यांचा खर्च ही जास्त व्हायचा. नगर मधील विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर अभ्यासक्रमाबद्दलचे महत्व, मार्गदर्शन, येणाऱ्या काळात आर्किटेक्चर क्षेत्रात येणाऱ्या कॉलेजमधून सुवर्ण संधी या बद्दलची कमी हे सगळे लक्षात घेऊन व क्षेत्रातील संबंधित तज्ञांचा सल्ला घेऊन सन २०१७-१८ या वर्षापासून रमेश फिरोदिया एजुकेशनल ट्रस्ट च्या माध्यमातून वाळूज येथे रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ची सुरवात केलेली आहे. या वर्षी कॉलेज ला नुकतेच ५ वर्ष पूर्ण झाले असून आर्किटेक्चरची पहिली बॅच बाहेर पडली आहे. पहिल्या बॅचचा निकाल ९५ टक्के लागलेला असून बरचसे विद्यार्थी देशातील विविध राज्यात काम करत आहेत. चौथ्या वर्षाला शिकत असणारे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पुणे मुंबई, नाशिक, अहमदाबाद, दिल्ली, गोवा येथे ६ महिन्यांसाठी होती. आर्किटेक्ट्स कार्यालयामध्ये प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेत आहेत. महाविद्यालयातर्फे होणाऱ्या या प्रदर्शनाचा आर्किटेक्चर क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रमुख पाहुण्यांनी सर्व प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पकतेचे कौतुक केले. सिद्धी बांगर व तनया वाळुंजकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रदर्शनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.