Parineeta Nursery

Parineeta Nursery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parineeta Nursery, Nurseries & Gardening Store, Jachak Vasti, Indapur, Bhavani Nagar.

Parineeta Nursery has wide range of plants including Bamboos, Cactus, Climbers & Creepers, Flowering, All types off Fruit, Indoor & Outdoor Plants, Palms n Cycads
Tissue culture – Banana G9 (Grand Naine) & Yelakki

04/10/2021

गौरी गणपती साठी इनडोअर व आऊटडोर झाड ऊपलब्ध🌻
29/08/2021

गौरी गणपती साठी इनडोअर व आऊटडोर झाड ऊपलब्ध🌻

17/07/2021

कत्ती व "T" सकर
#मोठी_कत्ती - 350₹
#छोटी_कत्ती- 250₹
- 175₹
#कुरिअर_चार्ज_एक्स्ट्रा*
Call: 9422205661

"T" Sucker Video - https://youtu.be/wqtFGJcRic0

Parineeta Nursery has wide range of plants including Bamboos, Cactus, Climbers & Creepers, Flowering, All types off Fruit, Indoor & Outdoor Plants, Palms n Cycads
Tissue culture – Banana G9 (Grand Naine) & Yelakki

 🌾🌾🌾गन्ना मास्टर तंत्रज्ञाना नेमकं काय आहे या बाबत शेतकरी विचारत आहेत. त्याबाबद्दल ही सविस्तर पोस्ट आहे.👉गन्ना मास्टर तं...
09/07/2021

🌾🌾🌾
गन्ना मास्टर तंत्रज्ञाना नेमकं काय आहे या बाबत शेतकरी विचारत आहेत. त्याबाबद्दल ही सविस्तर पोस्ट आहे.
👉गन्ना मास्टर तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे?*
शेतकरी बांधवांनो गन्ना मास्टर हे एक ऊस उत्पादनाचे सर्व समावेशक असे तंत्रज्ञान आहे. सदरचे तंत्रज्ञान शास्त्रीय माहितीतून व शेतकरी स्वअनुभवातून विकसीत केलेले आहे. यामध्ये उसशेतीतील खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाते. ऊस उत्पादनातील सातत्य राखणे ही एक खूप कठीण बाब आहे. एखाद्या वर्षी उत्पादन मिळते पण त्यात सातत्य रहात नाही. सध्या ऊस उत्पादक शेतकरी जास्त उत्पादनाच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करताना दिसत आहेत. विक्रमाच्या नादात एक दोन सिझन उच्च उत्पादन मिळते देखील. काळानुसार जेव्हा जमिनीची ताकद कमी होईल तेव्हा उत्पादनात घट येत जाते.
गन्ना मास्टर या ऊस उत्पादन तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जमिनीच्या तयारीपासून ते ऊस पीक तोडणीपर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. 100 टन प्लस उत्पादन काढताना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
♦️1. जमिनीची तयारी
♦️2. शेणखत, हिरवळीच्या खताचा वापर
♦️3. ऊसासाठी सरी किती फुटाची असावी आणि दोन डोळ्यातील अंतर किती असावे
♦️4. ऊसाच्या कोणत्या जातीची निवड करावी
♦️5. ऊसाचे आदर्श बियाणे कसे असावे
♦️6. रोपलागवड करावी का कांडी लागण?
♦️7. रासायनिक खतांचा संतुलित आणि गरजेपुरताच वापर कसा करावा.
♦️8. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कसा आणि कधी करावा.
♦️9. ऊसाच्या फटव्यासाठी काय करावे?
♦️10. ऊसामध्ये एकरी संख्या कशी मेंटेन करावी..
♦️11. उसाच्या वाढीच्या काळात कोणत्या फवारण्या व आळवणी कराव्यात.
♦️12. ऊसामध्ये बाळभरणी/भरणी कधी आणि कशी करावी.
♦️13. ऊसामध्ये पाचट कधी काढावे
♦️14. मुख्य वाढीच्या काळात ड्रीप द्वारे खतांचे नियोजन कसे करावे
♦️15. कीड आणि रोग व्यवस्थापन
♦️16. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ
जर आपणास ही हे तंत्रज्ञान वापरायचे असेल तर अधिक माहितीसाठी खालील नं वरती संपर्क करा...
👉9422205661 कपिल जयप्रकाश जाचक

 #परिणीता_नर्सरी येथे ऊपलब्ध 🙏कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओल...
18/06/2021

#परिणीता_नर्सरी येथे ऊपलब्ध 🙏
कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया कदंब असून अनेक ठिकाणी याची लागवड मुद्दाम करतात. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार व भारत या देशांत हा आढळतो. भारतात कोकण, कर्नाटक, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी हे वृक्ष मोठ्या संख्येने आढळून येतात. कदंबाचे खोड सरळ व १२-२१ मी. उंच असते. घेर १.८-४.५ मी. असतो. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या असतात, हे या झाडाचे वैशिष्टय आहे. कोवळे भाग लवदार; पाने साधी, समोरासमोर, मोठी, ३० सेंमी. लांब आणि १५ सेंमी. रुंद, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून चकचकीत तर खालून लवदार असतात. फुलोरे गोल, एकेकटे व अग्रस्थ असतात. फुले नारिंगी, लहान व सुवासिक असतात. पिकलेले फळ पिवळे व लहान संत्र्याएवढे असते. नारिंगी व मांसल पुष्पासनावर बोंडे गर्दीने रचलेली आणि अल्पबीजी असतात. बिया लहान व खरबरीत असतात.

कदंबाची फळे खाण्याजोगी असली, तरी चवदार नसतात. त्याचे लाकूड मजबूत व नरम असून कापण्यास, रंधण्यास सोपे जाते. मात्र लाकूड फारसे टिकाऊ नसते. होड्या, खोकी, तक्ते, फळ्या, आगपेट्या व काड्या, कागद, सजावटी सामान, चहाच्या पेट्या, कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी या लाकडाचा वापर करतात.

या वृक्षाची साल, पाने व फुले यांचे विविध औषधी उपयोग आहेत. याची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. पित्त, दाह, ताप व खोकला झाल्यास सालीचा वापर करतात. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. अपचन आणि ज्वर झाल्यास फळे उपयोगी पडतात. या वनस्पतीत सिंकोटॅनिक आम्ल असते.

  येथे उपलब्ध #कमळनिलंबो नुसिफेरा म्हणजे कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा ...
19/04/2021

येथे उपलब्ध

#कमळ
निलंबो नुसिफेरा म्हणजे कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.

👉कुमुदिनी (निंफिएसी) याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य: " | कमळ, " | शास्त्रीय वर्गीकरण ...
कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा कमळगठ्ठ्याचे मणी असे म्हणतात. हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात. प्राचीन काळापासून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मण्यांना मान्यता आहे. कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर होतो.

👉कमळ हे भारत आणि व्हिएतनाम चे राष्ट्रीय फूल आहे. ही प्रजाती मुख्यतः भारतात हिमालय ते खाली श्रीलंका येथपर्यंत उगवते. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस म्हणतात.

👉कमळ आणि कुमुदिनी यातील फरक
'कमळ (Nelumbo)' आणि 'कुमुदिनी उर्फ वॉटर लिली' मूलतः या दोन्ही जलीय वनस्पती असून दिसायला सुंदर आणि सामान्य माणसाला सहजासहजी भेद न करता येणाऱ्या वनस्पती आहेत.

राइज अँड शाईन या कंपनीचे टिश्यू कल्चर केळी रोपांसाठी बुकिंग सुरू आहे.राइज अँड शाईन या कंपनीचे आम्ही अधिकृत विक्रेते आहोत...
13/02/2021

राइज अँड शाईन या कंपनीचे टिश्यू कल्चर केळी रोपांसाठी बुकिंग सुरू आहे.
राइज अँड शाईन या कंपनीचे आम्ही अधिकृत विक्रेते आहोत
जाचक पॅटर्न (जोडओळपद्धत)पद्धतीने 1452 रोपे लागतात.

🍌🍌🍌🍌🍌
19/09/2020

🍌🍌🍌🍌🍌

 🍌🍌 trunks for their water holding capacity can be used as containers for growing plants.Take mature  🍌🍌 trunks(खोड),mak...
18/09/2020

🍌🍌 trunks for their water holding capacity can be used as containers for growing plants.Take mature 🍌🍌 trunks(खोड),make holes as shown in picture,fill the holes with soil(माती) and manure(खत)and plant saplings/plantlets/seeds......No watering is required at least for 20 days.....What a wonderful idea.👍👍👌👌

 #नारळनारळ लागवडीबाबत माहिती...नारळ लागवडनारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक...
17/09/2020

#नारळ
नारळ लागवडीबाबत माहिती...
नारळ लागवड
नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडांत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत.

माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.
#परिणिता_नर्सरी येथे नारळाची #रोपे_उपलब्ध

Address

Jachak Vasti, Indapur
Bhavani Nagar
413104

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6:15pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919422205661

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parineeta Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share