SVS बीज बँक seeds bank

SVS बीज बँक seeds bank SVS बीज बँक ,seeds bank

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरयेथे "जिनोम सेव्हिय...
04/01/2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर
येथे "जिनोम सेव्हियर" या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माझा हा प्रवास माझी मार्गदर्शक आणि नेहमी मला या कामात खंबीरपणे साथ देणारी माझी आई , प्रत्येक क्षेत्रात (मग ते शिक्षण असो किंवा अजून काही) नेहमी खंबीर पणे माझ्या पाठीशी उभे राहतात ते माझे आजोबा श्री. अशोककुमारजी ओझा .माझे गुरू श्री. मिलिंद रानडे सर,श्री.प्रकाश बीडकर सर, श्री. दिपक गायकवाड सर,श्री. नरेंद्र रेड्डी सर ,श्री. भागवत काका , सर्व मार्गदर्शक पत्रकार, SVS परिवार यांच्यामुळेच हे शक्य झाले.
मी हा पुरस्कार माझे नानाजी कै. बद्रिनारायजी पांडे यांना समर्पित करत आहे यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळेच हे मी आज इथपर्यंत पोहोचले.

आपल्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद 🙏आपल्या सगळ्यांची ऋणी आहे.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀नमस्कार...लवकरच पावसाळा येत आहे सगळ्यांची बागेत नवीन नवीन झाडे लावायची लगबग सुरू झालीच असेल ...आपल्या सर्वांसाठी...
28/05/2024

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
नमस्कार...
लवकरच पावसाळा येत आहे सगळ्यांची बागेत नवीन नवीन झाडे लावायची लगबग सुरू झालीच असेल ...
आपल्या सर्वांसाठी किचन गार्डनसाठी खास बियांचा किट उपलब्ध केला आहे . गच्चीवरील बागेत, गॅलरीत, परसबागेत आपल्यासाठी लागणारा भाजीपाला आपण स्वतः पिकवून गावरान आणि केमिकल फ्री भाज्यांचा आनंद घेऊ शकता.

1)गावरान पालक-20ते 80 बिया
2)गावरान कोथंबीर - 20 ते 40 बिया
3)गावरान चुका -15 ते 25 बिया
4)पांढरा हादगा - 10 ते 25 बिया
5)दुधी भोपळा- 5 ते 18 बिया
6)कारले -5 ते 10 बिया
7)हिरवी अंबाडी -20 ते 30 बिया
8)लाल अंबाडी -20 ते 30 बिया
9)हिरवी भेंडी -10ते 15बिया
10)लाल भेंडी- 10 ते 15बिया
11)गवार -10ते 15बिया
12)चौधरी शेंग -5 ते 10 बिया
13)गावरान झुमके दोडके -5 ते 10 बिया
14)घोसाळे -5 ते 10 बिया
15)चेरी टोमॅटो -15 ते 20 बिया
16)वांगे -20 ते 30 बिया
17)रंगीत मका ( एकाच कणीसला वेगवेगळ्या रंगाचे दाणे)5 ते 10 बिया
18)लाल हादगा -5 ते 10 बिया
19)बेल - औषधी -5 ते 10 बिया
20)लाल गुंज -औषधी-5 ते 10 बिया
200 रू ला हा भाजीपाला किट असेल. फ्री.फ्री फ्री शिपिंग. .....किटमध्ये वरील 18 प्रकारच्या भाजीपाला बिया येतील आणि 2 प्रकारच्या औषधी बिया असे एकूण 20 प्रकारच्या बिया येतील.
वरील बिया नामांकित शेतकरी कडून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या गावरान ,ताज्या आणि उत्तम प्रतीच्या त्याची पूर्ण खात्री आहे. पण मोठमोठ्या कंपन्या देखील बिया उगवण्याची खात्री देत नाही तसेच मी देखील बियाणे उगवण्याची कुठलीही खात्री देऊ शकत नाही .

ज्यांना बिया हव्या त्यांनी कृपया 7841941267 या नंबर वर व्हॉट्स ॲपला मेसेज करावा.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 #गोरखचिंच              गोरखचिंच (शास्त्रीय नाव: Adansonia digitata, अदानसोनिया डिजिटेटा ; इंग्लिश: African baobab , आफ्...
03/01/2024

#गोरखचिंच

गोरखचिंच (शास्त्रीय नाव: Adansonia digitata, अदानसोनिया डिजिटेटा ; इंग्लिश: African baobab , आफ्रिकन बाओबाब ;) हा मूलतः आफ्रिका खंडात किलिमांजारो, टांझानिया मधील आहे तसेच उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा वृक्ष आहे. याची उंची ५० फुटांपर्यंत असून हा पानगळी वृक्षात मोडतो.गोरखचिंच हे झाड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खोडाच्या वाढीमुळे ओळखता येते.खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो.या झाडाला उन्हाळ्यामध्ये फुले येतात व ती रात्री उमलतात फुलांची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या झाडांचे परागीभवन वटवाघळे आणि हाँक पतंग हे करतात त्यानंतर महिनाभरात फलधारणा होऊन त्याला शेंगा लागतात खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात.🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
महाराष्ट्रात ही खूप दुर्मीळ वृक्ष वनस्पती आहे. पुण्यात विद्यापीठ परिसरात एक मोठा गोरखचिंचेचा वृक्ष पाहावयास मिळतो. सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हा वृक्ष पाहायला मिळतो. याची मुळे खूप लांब असून ती जमिनीमध्ये लांबवर पसरतात. त्यामुळे एक मजली- दोन मजली इमारती या मुळांनी उखडून टाकल्याची नोंद मी कुठेतरी वाचली आहे.याची उगवण बियांपासून होते.. 10 ते 15 दिवसांत छोटेसे रोप सहजपणे उगवते.
🌳🌳🌳🌳🌳🌳

गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. याच्या बाओबाब या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे.
🌳🌳🌳🌳🌳🌳

गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. गरापासून शीत पेय करतात. गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो.फळातील मगज थोडा मधुर ,आंबट, तुरट लागतो पण फार पिठूळ असतो. थंड सरबताकरिता देखील याचे फळ वापरतात,केनयात या बियांना तिखट मीठ लावून खातात.

जंगली प्राणी याची पाने आवडीने खातात.सुकलेली पाने स्वेदक (घाम आणणारी) आणि मुत्रपिंड विकारावर उपयुक्त . माणसे खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात तसेच याच्या सालीतील धागा दोऱ्या पिशव्या व जाड्याभरड्या कापडास आणि चलनी नोटांच्या चिवट कागदास उपयुक्त असतात आणि अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो. याचा डिंक पाळीव जनावरांच्या व उंटांच्या जखमांना लावतात.🍀🍀🍀🍀🍀
फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलके असते मऊपणामुळे लाकूड फक्त आगपेट्यांच्या कारखान्यात उपयुक्त आहे.असा हा खुप कमी प्रमाणात दिसून येणारा वृक्ष आपण पाहिला असेल तर कोठे पाहिला ते कमेंट करून नक्की कळवा🙏😊

🖊️श्रुती ओझा.....

* #गुंज*गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गुंजेचा वेल असतो.बागेत व शेतातही गुंज लावतात.गुंजेची पाने...
02/01/2024

* #गुंज*

गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गुंजेचा वेल असतो.बागेत व शेतातही गुंज लावतात.गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. (एक गुंज=तोळ्याचा ९६वा भाग). *पूर्वी भांडण झाले असता गुंजेचे नाव त्यातही यायचे की मी तुला गुंजभर सोन देणार नाही* 😂 म्हणजे खरोखरीच गुंजेला महत्व आहे बर का🤩 गुंज लाल ,पांढरी, काळ्या रंगात प्रामुख्याने आढळते , *पांढऱ्या गुंजेची मुळे व पाला औषधात वापरतात. मानसिक स्वास्थ मिळावे म्हणून बहूतेक लोक या गुंजाची माळ गळ्यात घालतात*
*मारवाडी समाजात श्रावण महिन्यात बायका फावल्या वेळेत गुंजा रेतीमध्ये पुरून खेळतात .*
गुंजेला संस्कृत नाव आहे- काकाणन्तिका, काकणन्ती, काकादनी, गुंजा, चिरिहिण्टिका, रक्तिका

तर हिंदीमध्ये- गुंज, गुंजा, घुंगची, घुंघची, चिरमिटी, माषा, रति

गुंजपाला खाल्ला की मिंटसारखा लागतो. गुंजपाला खाल्ल्या नंतर त्यावरून पाणी प्यायचे ते पाणी खुप गोड लागते ....आणि खोकल्यावर हा पाला उपयोगी पडतो असे म्हणतात.गुंजेची मुळे, पाने व बिया औषधी आहेत. मुळे व पाने मधुर परंतु बिया तिखट असतात. ही सर्व पौष्टिक, कामोत्तेजक, पित्तनाशक, रुचिवर्धक, कांतिवर्धक, नेत्ररोगहारक व चर्मरोगहारक असून जखमा व कंड यांवर गुणकारी आहे. ज्वर, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यांवर मुळे व पाने उपयुक्त असतात. मुळांचा रस कफनाशक आहे.
बसलेला घसा (आवाज) पाने चावून खाल्ल्यास लवकर आराम मिळतो. गुंजबिया बिया अधिक प्रमाणात विषारी असतात,बिया खाल्ल्याने उलटी,जुलाब ,मळमळ होते तसेच यकृताचे कार्य बिघडते आणि योग्यवेळी उपचार नाही मिळाल्यास मृत्य पण होऊ शकतो. म्हणून गुंजबिया खाऊ नये आणि लहान मुले याच्या रंगाने आकर्षित होऊन बिया खातील म्हणून त्यांच्या हाती बिया लागेल अश्याठिकाणी बिया ठेवू नये. याच्या बिया थोड्या घासून लावल्यास मातीत सहज रुजतात कुंडीतही हा वेल छान वाढतो.......लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गुंजबिया हव्या असेल तर बीज बँकेत बिया सद्या उपलब्ध आहे ..............🙏🤩
🖊️श्रुती ओझा🙏🤗

झटपट मेहेंदी😍 . साग/सागवानच्या झाडाचेकोवळे पान हाताने चोळल्यानंतर अगदी दोन मिनिटात बघा माझ्या हाताला किती सुंदर रंग आला❣...
05/10/2023

झटपट मेहेंदी😍 . साग/सागवानच्या झाडाचे
कोवळे पान हाताने चोळल्यानंतर अगदी दोन मिनिटात बघा माझ्या हाताला किती सुंदर रंग आला❣️ ....तर मग चला तुम्ही पण हा झाड शोधा आणि असा प्रयोग करून बघा आणि मला फोटू पाठवा बर का🤗🤗🤗

05/10/2023
05/10/2023

🌺🌺🌺 #बायो_एन्झाइम🌺🌺🌺

साहित्य: 1 भाग गूळ, 3 भाग लिंबू वर्गीय फळांच्या साली किंवा इतर फळांच्या साली आणि 10 भाग पाणी घ्या.

पद्धत

एका भांड्यात पाणी गरम करून गूळ घाला.

गुळाचे तुकडे लवकर विरघळण्या साठी गुळ बारीक करून, सर्व गूळ विरघळूपर्यंत ढवळत रहा.
एकदा गुळ विरघळला की ते भांडे थंड होऊ द्या.
आता फळांच्या साली टाकून प्लास्टिकची बाटली भरा. (आपण प्लास्टिकची बाटली वापरली आहे हे सुनिश्चित करा कारण धातू किंवा काचेच्या बाटलीत करू नये. आपल्या घरी डिस्पोजेबल प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुन्हा वापर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

अखंड रासायनिक प्रतिक्रिये साठी बाटलीला हवाबंद ठेवणे आवश्यक आहे. आपण वापरत असलेल्या बाटलीत थोडीशी उघडत असल्यास, तयार झालेले वायू सोडण्यासाठी आपण दिवसातून दोनदा झाकण उघडून बंद करा.

बायो-एन्झाईमची पहिली तुकडी तयार करण्यास सुमारे 90 दिवस लागतात. जुन्या तुकडीचा एखादा भाग नव्याने वापरल्यास पुढील बॅच वेगवान केली जाऊ शकते.

बायो-एंझाइम्स कोणत्याही कीटकांना आकर्षित करीत नाहीत. दोन्हीही उत्पादनाला दुर्गंधी येत नाही. त्यात फक्त आंबलेल्या फळांचा सौम्य वास आहे. परंतु सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे उत्पादन अत्यंत अष्टपैलू आहे स्नानगृह आणि अगदी भांडी साफ करण्यासाठी आणि बागकाम करण्यासाठी वापरले जाऊ शकता.

पहिल्या तुकडीसाठी, आपल्याला कदाचित तीन महिने थांबावे लागेल परंतु लवकरच, आपण दरमहा एक बॅच बनवू शकता आणि भांडी,बेसिंग आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

बायो एंझाइम सर्व फळाची साल वापरून बनवले जाऊ शकते, घरगुती साफसफाईच्या क्षमतांसाठी, लिंबू, संत्रा, लिंबू आणि अननस ही केवळ लिंबूवर्गीय फळाची साल वापरण्याचीच शिफारस केली जाते. आपण एकतर यापैकी चारही वेगवेगळ्या बॅचमध्ये स्वतंत्रपणे चाचणीसाठी वापरू शकता जे अधिक प्रभावी आहे किंवा ते एकामध्ये एकत्रित करू शकता. नमूद केल्याप्रमाणे, आपण केळी आणि आंबा वापरू शकता - परंतु ते लिंबूवर्गीयांसारखे प्रभावी होणार नाहीत. शिवाय, त्यांना लिंबूवर्गीयांसारखे महान वास येऊ शकत नाही!

कुजलेले फळ किंवा खराब झाले फळ असेल तर आपण ते पूर्णपणे घालू शकता किंवा कट करून वापरू शकता

ीज_बँक

पान कणीस/रामबाण पिकलेल्या कणसातील मऊ भाग /कापूसजखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव लगेच थांबतो .झ...
28/09/2023

पान कणीस/रामबाण

पिकलेल्या कणसातील मऊ भाग /कापूसजखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव लगेच थांबतो .झाडांच्या मुळ्या मोठ्या असल्याने नदीकाठची जमीन धरून ठेवतात आणि जमिनीची धूप थांबवितात.

🖊️श्रुती ओझा

☘️☘️☘️☘️☘️☘️
आम्हीं ह्याला कपाचं कणीस म्हणत होतो. नदीच्या पत्रात उगवत.आणि वर अशी कणसे येतात.आता राहिले नाहीत.
साधारणपणे45वर्षापुर्वी गावा कडील जेष्ट मंडळी ह्या कणसांना काढून त्याचा रुई करून लाकडी कोळशाच्या राखेत मिसळून एकमेकां चोळून आपल्या बटव्यात ठेवत होते,त्याला कप म्हणायचे. त्यासोबत एक छोटी गारगोटी ची चीप आणि दोन इंच लांबीची लोखंडी पट्टी ठेवायचे.
कप गारगोटी आणि लोखंडी पट्टी या तिघांना चकमक म्हणत असत. रानावनात, पाऊस पाण्यात विस्तव पेटवण्यासाठी याचा उपयोग करीत असत. तो असा. गारगोटीच्या चिपिवर चिमूटभर कप डाव्या अंगठ्याने धरायचा आणि उजव्या हाताने त्या गरगोटीवर लोखंडी पट्टी वरून खाली अशी घर्षणायुक्त मारायची.घर्षण होऊन स्पार्क व्हायचा आणि तो कणसाचा कप पेट घ्यायचा. मग तो विडी किंवा चिलीम च्या वर ठेउन ती पेटवायची. गरज पडल्यास कडी कचरा पेटून मोठा जाळ पण करत असत. हे सर्व काडी पेटीचे काम होत होते. कातडी बटवा असल्यामुळे ह्या चकमकीला पावसाचा धोका नव्हता. म्हणून ती पावसाळ्यातील व रणावणातील आगपेटी होती.

🖊️श्री.परमेश्वर बंदेवार

☘️☘️☘️☘️☘️☘️

अहमदनगर आणि पुणे जिल्हा येथे याला कंजाळ असे स्थानिक नाव आहे. दलदलीच्या ठिकाणी ओढ्यात तसेच नदीच्या चोपण माती असणाऱ्या डबक्यात ही वनस्पती वाढते. धाब्याची ,कुडाची घरे,गोठे अच्छादणासाठी छप्पर तसेच गवताच्या भिंती म्हणून याचा वापर पूर्वी केला जात असे. रुई,कावळ,या झाडाप्रमाणेच याच्यात सुद्धा वाऱ्यावर उडणारी कापसाची म्हातारी असते.

🖊️श्री.आबासाहेब मोरे
☘️☘️☘️☘️☘️☘️

साधारणत: दलदलीच्या जागी उगवते. आमचेकडेही पानकणीसच म्हणतात.आधी दवखाने डाॅ नव्हते ठेच लागल्यावरच नव्हे तर गुरांनी मारल्यावर होणार्‍या मोठ्या जखमामध्ये भरत असत ,जसेआता प्रत्येक घरात डेटाॅल त्या प्रमाणे ही कणसे घराघरात असत.

🖊️आशालता व्यवहारे
☘️☘️☘️☘️☘️

होय ह्याला रामबाण म्हणतात. आमच्या लहानपणी आमच्या जखमांवर याचा बर्‍याच वेळा उपयोग केलाय. कितीही खोल जखम असली तरी टाके घालायला लागत नसत. एकदा जखमेतून हा कापूस भरला की जखम पूर्ण बरी होईपर्यंत त्याकडे बघावं लागत नसे व कसलाही व्रण किंवा खूण रहात नसे.

🖊️श्री .विनय जोशी

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

ह्या च्या कणसातील कापूस काढून तो जाळून राख करावी आणि ती जखमेवर लावावी. भाजणे, कापणे, नायटा, गळू, खरूज,सर्व झटक्यात बरे होते. चिडले अंग असणार्या लोकांना वरदान.

🖊️मंजिरी नागपूरकर

☘️☘️☘️☘️☘️☘️

रामबाण ही गवतकुळातील दलदलीच्या ठिकाणी येणारी बहुगुणी वनस्पती आहे, हि वनस्पती अँटीसेफ्टीक औषधीचे काम करीत असून पूर्वीचे लोक जखम झाल्यास ती भरून येण्यासाठी हिचा कापूस जखमेवर लावून ठेवत असे,त्याचप्रमाणे या वनस्पतीचा कापूस ज्वालाग्राही असल्यामुळे पूर्वी चिलीम किंवा विडी ओढणारे या कापसाला चिलिमित पुढील बाजूस भरून गरगोटीच्या सहाय्याने तो पेटवून चिलीम ओढत असत या पेक्ष्या देखील अधिक उपयोग करीत असावेत असावेत काळाच्या ओघमध्ये अश्या दुर्मिळ बहुगुणी वनस्पती नष्ठ होत चाललेल्या आहेत त्या जतन केल्या पाहिजेत,
महाराष्ट्रातील काही समाजामध्ये हे कणीस लग्नांमध्ये देवक म्हणून आजदेखील प्रचलित आहे.

श्री.अनिल जगताप

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

एक आठवण आहे ती सांगते, लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो तेव्हा माझ्या बहिणीच्या पायाला गरम चहामुळे भाजलं होतं
आमच्या आजीने रामबाण वनस्पतीचे कणीस जाळून त्याची राख जखमेवर लावली
एक दोन दिवसात जखम एकदम बरी झाली होती

🖊️अनिता मोरे

 #टणटणी , #कंबर_मोडी अशा या विविध नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सहजरीत्या कुठेही उगवलेली आपल्याला दिसून येते.टणटणीच्या ...
27/09/2023

#टणटणी , #कंबर_मोडी
अशा या विविध नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सहजरीत्या कुठेही उगवलेली आपल्याला दिसून येते.

टणटणीच्या पानांमध्ये आयोडीन चे प्रमाण जास्त असल्यामुळे जखमेवर याचा पाला चोळून लावल्यास जखम लवकर भरते.जखमेतून वाहणारे रक्त पण थांबते. जनावरांच्या जखमेवर देखील हा उपाय करू शकता.

🖊️श्रुती ओझा
☘️☘️☘️☘️☘️
आम्ही याला टणटणी म्हणतो माझ्या मुलाला लहान असताना नाकाला जखम झाली होती तेव्हा माझ्या वडिलांनी हा टणटणीचा पाला हाताने रगडून त्या जखमेवर लावला दोन दिवसांनी जखम लगेच बरी झाली छान उपाय

🖊️रोहिणी ससाणे.

☘️☘️☘️☘️☘️☘️

कोल्हापूरकर याला दगडी पाला असे म्हणतात. लहानपणी दररोज खेळताना, चालताना पडलो तर लहान मोठी जखम झाली की पहिला उपाय हाच होता, दुसरा काही उपाय नव्हता, लगेच जखम बरी व्हायची आणि सर्व सखे पाला आणुन लावायला मदत करायचे. त्यामुळे जखम लवकर बरी व्हायची.

🖊️श्री.सदाशिव घुगरे

☘️☘️☘️☘️☘️

कुट कुटी ,दगडी पाला च आहे, दात, दाढ दुखत असेल तर ज्या बाजूचा दात दुखत असेल त्या बाजूच्या कानात, याची पाने स्वच्छ धुवून त्याचा रस कानात सोडावा, दात दुःखी थांबते, मी स्वतः वापरले आहे, मूतखडा साठी ही त्याचा तीन चार चमचे रस उपाशीपोटी घेतल्यास चांगला फरक पडतो

श्री.मयूर जाडकर
☘️☘️☘️☘️☘️☘️

वातासाठी उपयुक्त. कुकरमध्ये भरपूर पाण्यात शिजवायचा. कुकरच्या झाकणाला शिट्टी लावायची नाही व त्या वाफाराने अंग शेकायचे.
अंगावर कुठेही फोड झाल्यास तो पिकवण्यासाठी ह्याचा पाला वाटून त्या फोडाला बांधायचा.
पायमुरगुळुन सुज आल्यास त्या ठिकाणी हा पाला बांधायचा.
पाठ कंबर दुखत असल्यास विट गरम करून सुती कपड्यात हा पाला ठेवुन त्यावर ही विट ठेवुन शेक घेतल्यास कंबर दुखणे बंद होते.

🖊️मीरा ठोंबरे

व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकचा वापर करू शकता

https://chat.whatsapp.com/JB2asBQbhumKcx27M74qup

☘️☘️हाडजोडी / कांडा वेलं/ कांड वेल☘️☘️अश्या विविध नावाने ओळखली जाणारी ही औषधी वनस्पती. दिसायला आकर्षक आणि तेवढीच उपयोगी ...
26/09/2023

☘️☘️हाडजोडी / कांडा वेलं/ कांड वेल☘️☘️

अश्या विविध नावाने ओळखली जाणारी ही औषधी वनस्पती. दिसायला आकर्षक आणि तेवढीच उपयोगी अशी ही वेलं आहे .
☘️☘️☘️☘️
कटिंग पासून सहज उगवणारी ,कमी काळजी घ्यावी लागणारी , कुंडीत किंवा जमिनीत सहज उगवणारी आणि छान वाढणारी अशी ही हाडजोडी.

सांधेदुखी , सुज ,हाडांचे विकार यावर याचा रस प्यावा लवकर आराम मिळतो ( 1 चमचा रस आणि 2 चमचा तूप सोबत प्यावा आणि लगेच एक ग्लास दूध प्यावा , हाड मोडल्यावर (फॅक्चर ) याचा वेलं बारीक वाटून त्या ठिकाणी लावल्यास हाडे लवकर जोडली जातात कारण यात भरपूर प्रमाणत कॅल्शियम आहे.

योग्य जाणकारांच्या सल्ल्यानेच उपयोग करावा

🖊️श्रुती ओझा🙏😊
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

हाडजोड अथवा आस्थीसंहारक टोटल सहा स्टीराॕईड वा कॕल्सीअम आॕक्झाॕलेट असलेल हे वनस्पती कांड्या तुपात तळुन खाव्यात मनके वा गुढगे झीज थांबते

🖊️डॉ.कैलास उगले
☘️☘️☘️☘️☘️

ही चौ धारी कांडवेल.
मी याचे सूप करून प्यालो. चांगला फायदा झाला. फ्रॕक्चर लवकर, वेदनारहित, बेमालूम जुळले.
कपभरासाठी दोन तीन कांड्या. पिलरने साल काढून टाकायची.
लहान तुकडे करून उकळायचे दहा मिनीट.
मीठ साखर चवीला टाकून तुपात जिऱ्याची फोडणी.
गरम प्या चमच्याने. रोज एकदा तीन आठवडे.

🖊️श्री.प्रकाश कुलकर्णी

☘️☘️☘️☘️☘️☘️

हड्डीजोड हळद, तुरटी आणि मोहरीच्या तेलात गरम करून लावणे कितीही जुने दुखणे असेल तरी बरे होते.

🖊️श्री.दिनेश भालेकर

☘️☘️☘️☘️☘️☘️

मला माहित असलेला उपयोग नकुर्डे झाल्यानंतर होतो नकुर्डे म्हणजे नखाभोवती जखम होते लवकर बरे नाही झाले तर नख निघुन पडते. अशी जखम झाली तर हि कांडी आणि लहान मिठ चेचून गरम करून नकुर्डे च्या जागी बांधतात.

🖊️श्री .संजय डांगे

☘️☘️☘️☘️☘️☘️

मला माहित असलेले उपयोग पूर्वी कांड झालं तर ठेचून कांड्यावर लावत असत,कांडताना हाताला खाज सुटते म्हणून हाताला खोबरेल तेल लावून ठेचावी. नंदूरबार जिल्ह्यातील अधिवशी लोक हाड मोडल्यास जोडून बांधून ह्याची साल काढून छोटे तुकडे करून बेसनात टाकून भाजी खातात.श्रीमंत लोक तुपात शिरा बनवून खातात.गाय म्हैस विल्या नंतर काही जनावरात गर्भाशय बाहेर येते. त्याला गावठी भाषेत पेल पडणे म्हणतात जनावरास त्रास होते अश्या वेळी .तीन चार कांड्या तोडून सपाट दगडावर ठेचून पेस्ट दोन्ही हातात चे ओंजळीत धरून बाहेर आलेल्या गर्भाशयात लावावा त्वरित गर्भाशय आता ज्यायला लागते कुणी जनावर सांभाळत असेल त्यांनी अवश्य वेल लावावा आणि बिना पैश्याचा इलाज करून पाहावा मी पाहिला.

🖊️श्री.धनंजय मिसाळ

🌼🌼🌸घाणेरी🌸🌼🌼घाणेरी आणि टंटणी या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती मूळची भारताची नसून शोभेसाठी भारतात आणली गेली.भारतात ही एव...
04/08/2023

🌼🌼🌸घाणेरी🌸🌼🌼
घाणेरी आणि टंटणी या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती मूळची भारताची नसून शोभेसाठी भारतात आणली गेली.भारतात ही एवढ्या झपाट्याने वाढली की आता त्याचे निर्मूलन करणे अवघड झाले आहे.त्याला फुले येण्याअगोदर हे कापली गेली तर याची वाढ होण्यास आळा बसतो.पण पावसाळ्यात परत जोमाने बहरते .ही बारामाही फुलणारी वनस्पती आहे .बागेत संरक्षणासाठी याचे कुंपण केले जाते. हे फुले दिसायला फार सुंदर आणि आकर्षक दिसतात. याच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण जखम आवरण व सूज यावर औषधी म्हणून वापरतात.याचे अनेक औषधी गुणधर्म आहे.

अनेक रंगात याची फुले दिसून येतात , आणि त्याच्या अनेक बारीक फुलांचा मिळून एक फुल असे फुलांचे गुच्छ झाडावर खूप सुंदर दिसतात.

याचा दर्प उग्र असा येतो त्यामुळे जनावरे ज्यास्त यास खात नाही, पक्षी मात्र याची फळे आवडीने खातात.🌼

Address

Beed
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVS बीज बँक seeds bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share