Malvani Aaji

Malvani Aaji Malvani Aaji ....
Malvani recipes..

24/07/2024

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या 🙏🏻

अळुवडी।साहित्य:१) अळूची पाने ८-१० (कोवळी अन छोटी असतील तर उत्तम),२) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट अ...
22/07/2024

अळुवडी।

साहित्य:

१) अळूची पाने ८-१० (कोवळी अन छोटी असतील तर उत्तम),
२) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते),
३) हिरव्या मिरच्या ७-८,
४) लसूण पाकळ्या ७-८,
५) जीरं / (जिरपूड) १ छोटा चमचा,
६) गुळ १ छोटा चमचा (किसून),
७) चिंचेचा कोळ १ चमचा,
८) मीठ चवीनुसार,
९ )तळण्यासाठी तेल,
१० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा (आॅप्शनल).

*कृती:*

अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या.
अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ कापून घ्या.

आता हिरव्या मिरच्या अन लसूण याचं वाटण करून घ्या.

एका बाउलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या. मिश्रण जास्ती पातळ नको जास्ती घट्ट नको. मध्यम ठेवा.

आता एक पान घ्या, ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या.
आता त्यावर पुन्हा एक पण ठेवा. परत सेम कृती करा. असे कमीतकमी ३-४ पानाच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या.

साधारण १०-१५ मिनिट वड्या उकडून घ्या.

सुरी खुपसून पहा जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली समजावी.

आता ह्या उकडलेल्या वड्या थोड्या थंड होऊ द्या. चाळण फिट्ट बसेल अशा आकाराचे एक पातेले घ्या.
त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा. नंतर ह्या पानाचा अलगद गुंडाळी करा.

एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा. आता वड्याचे काप करा. जर तुम्हाला वड्या क्रिस्पी अन कुरकुरीत हव्या असतील तर काप पातळ करा.
अन जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील. आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या. थोड्याश्या लालसर होईपर्यंत. क्रिस्पी अळूवड्या तयार आहेत.

आमच्याकडे सर्वाना कुरकुरीत वड्या आवडतात, म्हणुन मी शक्यतो कुरकुरीत होइस्तोवर तळते. तुम्हाला जर ओलसर हव्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही. अळूची पाने मोठी असतील तर त्यामुळे हमखास घसा खवखवतो म्हणूनच पाने छोटी अन कोवळी वापरावीत. अन नाहीच मिळाली तरी चिंचेचा कोळ अन गुळ घातल्यामुळे घसा खवखवत नाही.

_पाककृती गृप_
व्हाट्सअप्प।

One 💕❤️ love
12/07/2024

One 💕❤️ love

जय श्री राम 🙏
22/01/2024

जय श्री राम 🙏

18/01/2024

*आजपासून CASH भीक देणं बंद* भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. *अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.* आणि ही चळवळ योग्यच आहे.*कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही**याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर 'भिकारी' या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.*सुरवात करा पोस्ट शेअर करा..आणी कृपया एक हि रुपया भिकाऱ्याला देऊ नका.. खूप वाटल तर गाडीत 2बिस्कीट चे* *पुडे ठेवा पण पैसे देऊ नका* 🙏🙏या मोहिमेशी सहमत असल्यास हा विचार पुढील तीन ग्रुप पुढे पाठवा.*🙏🙏

01/01/2024

आमचा देवगड

https://youtube.com/shorts/eRvPR1qIxsY?si=UN4v7qg5TEhIMRqUव्हिडीओ ला लाईक करा 👍🏻😀......व कृपया मालवणी आजी चॅनेल ला सबस्क...
10/12/2023

https://youtube.com/shorts/eRvPR1qIxsY?si=UN4v7qg5TEhIMRqU

व्हिडीओ ला लाईक करा 👍🏻😀......
व कृपया मालवणी आजी चॅनेल ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻❤️!!!

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)नारळीरसासाठी साहित्य1 नारळपावकिलो गूळ1/4 टेबलस्पून वेलची पूड अर्धा चमचा हळद 1/4 टीस्पून...
04/12/2023

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)

नारळीरसासाठी साहित्य
1 नारळ
पावकिलो गूळ
1/4 टेबलस्पून वेलची पूड
अर्धा चमचा हळद
1/4 टीस्पून मीठ
शिरवाळेसाठी साहित्य
2 वाटी तांदूळ पीठ
1/2 टेबलस्पून मीठ
2 टेबलस्पून तूप
कृती _
एका भांड्यात 2वाटी पाणी गरम करण्यास ठेवले त्यात मीठ आणि तूप घालून उकळी येऊ दिली. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घेतले. हेच मिश्रण ताटात काढले आणि गरम गरमच असताना तोडा थंड पाण्याचं हबका मारून छान मळून घेतले.आणि झाकून ठेवले 10मिनिट. तोपर्यंत नारळाचे दूध काढून घेतले. आता दुधात किसलेला गूळ, वेलची पूड, हळद , मीठ घालून व्यवस्तीत ढवळून गूळ वितळून घेतला. आता पिठाचे गोळे करून चकलीच्या साच्याला तूप लावून त्यात गोळा घालून, इडली च्या प्लेटीत शेवया करून 10मिनिट वाफवून घेतल्या. छान अश्या शिरवाळे तयार झाले

Address

Police Station
Devgad
416612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malvani Aaji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malvani Aaji:

Share