Garden Making

Garden Making We provide garden making service on small and big scale

कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काचे महत्व...     शेताच्या बांधावर कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या अ...
03/02/2026

कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काचे महत्व...

शेताच्या बांधावर कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो.

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारला जातो. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकून, पतंगवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटेअळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळअर्काचा उपयोग होतो.

कडुनिंबाच्या बियामध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यातील अझाडिरॅक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल हे महत्त्वाचे घटक आहेत. निंबोळी अर्काचा किडीवर विविध प्रकारे परिणाम होतो. तसेच मित्र कीटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. त्यामुळे मित्र कीटकांद्वारे जैविक कीड व्यवस्थापन होते.

निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो?

निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात. कडुनिंबाची पाने व बियामध्ये अॅझाडीरेक्टीन, निंम्बिन व निंम्बिडिन, मेलियान ट्रीओल सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आहेत.

पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात.

पाच किलो निंबोळी चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावं. हे मिश्रण एकूण शंभर लिटर होईल एवढं पाणी टाकावं.

म्हणजे हा ५ टक्के निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा. उरलेला चोथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून उपयोग होतो X

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत करता येते.

त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून मित्र किडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येतो. गावातला प्रत्येक शतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळेल.

स्त्रोत - कृषीपत्रिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

पपनस … कोकणचं आश्चर्य.. मित्रानो कोकणात पिकणारं असं हे उत्कृष्ट फळ. पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकणा...
03/02/2026

पपनस … कोकणचं आश्चर्य..

मित्रानो कोकणात पिकणारं असं हे उत्कृष्ट फळ. पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकणात काही शेकड्यातच झाडं आहेत असा उल्लेखही मिळाला. तेव्हा आपल्या परसात जर झाड असेल तर ते तोडु नका. उलट त्याची रोपं तयार करा. एका चांगल्या फळाला आपण न्याय देवु शकत नसाल तर काय उपयोग ?
यापुढे पपनशीचं झाड तोडु नका. त्यातुन निदान पाच झाडं लावा हीच विनंती.

हे सगळं कशाला ? पपनस बचाव मोहीम चालु करुयात. खाली सगळी माहिती देतोय. वाचा. त्याचं महत्व लक्षात घ्या.

" पपनस वाचवा "

अधिक माहिती व उपयुक्तता

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात.

पपनसाचे फळ
पपनसाचे झाड ३० ते ३५ फुट उंच वाढते. पानांचा रंग गडद हिरवा असतो. पपनसाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला फुलांचे गुच्छ लागतात. फळे मोठ्या चेंडूच्या आकाराची,हिरव्या सालीची, १० ते ३० सेंमी व्यासाची असतात. वजन सुमारे १-२ किलोग्रॅम भरते. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात.

आढळ
महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत.

स्थानिक नाव
पपनसाला 'चकुत्र' 'बंपर' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. पपनीस / पपनस

वापर
पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा गर पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा गर साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे, मार्मालेड असे पदार्थ बनवतात. फुलांपासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडेसे कठीण असते.त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात.

मुख्य म्हणजे पपनसाच्या सालीपासुन ती उन्हात सुकवुन पावडर करुन मधातुन खाल्ल्यास ज्वर नाष होतो. ओली साल चावुन त्याचा रस पियाल्यास रक्तदाब नियंत्रणात येतो. पपनसाच्या सालीची चटणी पौष्टीक व पोट विकार घालवणारी असते. मोसुंब व संत्र या प्रमाणे त्याचे ज्युस पिण्यास उत्तम. साखर व मीठ चवीप्रमाणे घालुन घेतल्यास उन्हाचा त्रास कमी हितो. उन्हाळ्यात निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. डोळ्यात आंजुर्ली झाल्यास साल चिमटीत धरुन दाबुन रस डोळ्यात उडवल्यास आंजर्ली बरी होते. याचा रस काढुन ठेवता येतो. सरबत अतिशय छान होते. आंबा काजु रातांबा या प्रमाणे हे ही एक उत्कृष्ट फळ आहे.

01/02/2026
25/01/2026

🚨 बरेच शेतकरी पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम नायट्रेट यातील फरक नीट समजून घेत नाहीत.
चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया

1️⃣ पोटॅशियम सल्फेट (K₂SO₄)
घटक: पोटॅशियम (K) + गंधक / सल्फर (S)

याला आपण 0:0:50 असे म्हणतो.

✅ फायदे
हळूहळू उपलब्ध होणारे → दीर्घकाळ परिणाम

पिकाची रोग व थंडी सहनशक्ती वाढवते

फळांची गुणवत्ता सुधारते → गोडी, कडकपणा, टिकाऊपणा

गंधकामुळे प्रथिननिर्मिती व पोषण संतुलन सुधारते

⚠️ मर्यादा
❌ फवारणीसाठी योग्य नाही (एकघटक खते)
❌ काढणीपूर्वी लगेच उपयोगी नाही → शोषण मंद

⏰ योग्य वापराची वेळ
लागवडीच्या सुरुवातीला
फुलोऱ्यानंतर फळांच्या गुणवत्तेसाठी

2️⃣ पोटॅशियम नायट्रेट (KNO₃)
घटक: पोटॅशियम (K) + नायट्रोजन (N)

याला आपण 13:0:45 असे म्हणतो.

✅ फायदे
पूर्णपणे विद्राव्य → झपाट्याने शोषण
कमी क्षार निर्देशांक → खारट जमिनीत सुरक्षित
हिरवी व शाकीय वाढ वाढवते
फळांचा रंग, आकार, गोडी आणि चमक सुधारते
जमिनीतून तसेच फवारणीद्वारे वापरता येते

⏰ योग्य वापराची वेळ
कोणत्याही वाढीच्या टप्प्यावर
विशेषतः काढणीपूर्वी जलद परिणामासाठी

🔹 थोडक्यात तुलना

🟢 पोटॅशियम सल्फेट

✅ दीर्घकालीन परिणाम
✅ फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा
❌ फवारणीसाठी नाही
❌ काढणीपूर्वी लगेच नाही

🟡 पोटॅशियम नायट्रेट
✅ जलद शोषण
✅ जलद वाढ, रंग व गोडी
✅ जमिनीत व फवारणीसाठी योग्य

💡 शहाण्या शेतकऱ्याचा नियम:
👉 मुळापासून मजबुती हवी असेल तर पोटॅशियम सल्फेट
👉 लवकर परिणाम, रंग व गोडी हवी असेल तर पोटॅशियम नायट्रेट

24/01/2026

🌙 झाडांची वाढ रात्री जास्त का होते? 🌱
झाडं रात्री काम थांबवत नाहीत — ती फक्त कामाची दिशा बदलतात.

☀️ दिवसा:
झाडं प्रामुख्याने प्रकाशसंश्लेषणावर लक्ष केंद्रित करतात. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न (साखर) तयार केलं जातं.

🌙 रात्री:
प्रकाशसंश्लेषण थांबल्यानंतर, दिवसा तयार झालेली साखर
➡️ पेशी विभाजनासाठी
➡️ पेशी वाढीसाठी (cell expansion) वापरली जाते.

🌡️ रात्री तापमान कमी असल्यामुळे पाण्याची वाफ होण्याची क्रिया (Transpiration) कमी होते, त्यामुळे पेशी अधिक चांगल्या प्रकारे फुगू शकतात.

✅ म्हणूनच अनेक पिकांमध्ये व भाजीपाला पिकांमध्ये खोड व पानांची वाढ रात्री जास्त दिसून येते.
🌾 झाडांची वाढ कधीच थांबत नाही — ती फक्त रात्री अधिक हुशारीने काम करते.

*बहुउपयोगी रोजमेरी चे झाड* तुम्हाला माहित आहे का ?तशास्त्र असे सांगते की या झाडाच्या वासाने आपले मेमरी 75% ने वाढते. रोज...
10/01/2026

*बहुउपयोगी रोजमेरी चे झाड* तुम्हाला माहित आहे का ?

तशास्त्र असे सांगते की या झाडाच्या वासाने आपले मेमरी 75% ने वाढते. रोजमेरी हे एक पुदिना किंवा मिट या फॅमिली मधील डेझर्ट प्लांट आहे. आता फेब्रुवारी मार्चमध्ये याचे चार इंच सहा इंच लांबीचे कटिंग कोरफड किंवा मध किंवा दालचिनी पावडर किंवा रुटींग हार्मोन पावडर मधून लावा याच्या बिया पण जून जुलैमध्ये मिळतात पण त्याचं जर्मिनेशन चे प्रमाण हे थोडं कमी असतं. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेजर्ट प्लांट असल्यामुळे याला पाणी जास्त अजिबात चालत नाही साधारण आठवड्यातून एकदा जरी पाणी दिले तरी याला पुरेसे असते सहा इंच, आठ इंच, दहा इंच, कुंडीत हे प्लांट लावावे कारण ते कुठेही शिफ्टिंग करून ठेवता येते. प्रत्येक महिन्याला याचे सॉफ्ट प्रुनिंग करून ठेवावे आणि वरच्या शेंड्या कट करून त्या वाळवून जपून ठेवाव्यात तसेच झाडाला पण शेप द्यावा. 50% माती, 30 टक्के वर्मी कंपोस्ट, आणि 20 टक्के वाळू, या प्रमाणात माती घेऊन त्यात झाड लावावे

*या झाडाची खास वैशिष्ट्ये*

१)शास्त्र असे सांगते की या झाडाचा वास घेतल्याने 75% मेमरी वाढते

२) आपला नेहमीचा पराठा केव्हा भजी यामध्ये याची पाने बारीक करून घातल्यास एक वेगळ्याच पद्धतीचा खाण्याचा स्वाद पदार्थ तुम्हास चाखावयास मिळेल

३) या झाडामुळे डास तसेच इतर शत्रूकडे वगैरे येत नाहीत, याच्या वासाने ते पळून जातात.

४) याला आठवड्यातून एकदा केव्हा जास्तीत जास्त दोन वेळास पाणी लागते,,, जास्त पाण्याने याला मिलीबग होतात त्यामुळे झाड एखाद्या वेळा मरून पण जाते,, साधारण चार ते सहा तास पर्यंत सूर्यप्रकाश पुरेसा होतो.

५) सर्वसाधारणपणे हे झाड 35 ते 40 वर्षे अगदी सहज जगते.

६) रोजमेरीची वाळलेली पाने 30 ते 40 ग्रॅम घेऊन दोन कप पाण्यात उकळावे आणि ते पाणी गाळून घ्यावे आणि केसांच्या वर स्प्रे करावे त्याने आपल्या केसांना शायनिंग येते, केस मुलायम होतात, केस गळायचे प्रमाण खूप कमी होते, तसेच आपल्या नेहमीच्या तेलात याची पाने टाकून मंद आचेवर गरम करून त्याचे पण तेल लावावे
७) याची वाळलेली पाने आपल्या कपड्याच्या कपाटात ठेवावेत त्यामुळे कपड्यांना एक प्रकारचा सेंट सारखा छान वास येतो.

८) मला एक कल्पना सुचली आहे आणि ते मी अमलात पण आणली आहे म्हणजे त्याचे BIO ENZYME तयार करून घरात रूम फ्रेशनर किंवा फरशी पुसण्यासाठी म्हणून जरूर वापरावे.

९) *AROMATHERAPY सुगंध चिकित्सा* नैसर्गिकरीत्या वनस्पतीत सुगंधी वास असतोच आणि आपल्या श्वासाबरोबर तो आपण घेतला की त्याचा परिणाम आपल्या मेंदूच्या वर होतो त्यामुळे मनशांती मिळते तणाव कमी होतो झोप चांगली लागते सकारात्मक ऊर्जा येते वेदना कमी होतात नैराश्य जाते डोकेदुखी मायग्रेन समस्या दूर होतात रक्तदाब कमी होतो असे हे

बहुउपयोगी रोजमेरी चे छोटेसे झाड प्रत्येकाच्या घरात जरूर असावे* आहे दर महिन्यात कटिंग करून याची वाळलेली पाने जपून ठेवावीत आणि वरील प्रमाणे त्याचा उपयोग करावा तसेच याच्या कटिंग पासून लहान लहान रोपे तयार करावेत आणि आपल्या वर्षभरातल्या अनेक कार्यक्रमात म्हणजे वाढदिवस, तसेच गणपती मध्ये आराशीत याचे रोप ठेवावे.

हळदीकुंकू, कोणी अचानक पाहुणे आलेत तर काय त्यांना द्यायचं तर अशावेळी ह्याचा छोटासा रोपट त्यांना देऊन आपला आनंद व्यक्त करावा.*माहिती जर आवडली असेल तरच असे करा.

😊अभय कोटणीस कोल्हापूर 🚩

🌿 लपलेली उपासमार (Hidden Hunger) व अन्नद्रव्य कमतरता ओळखण्याची शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शिकातुम्हाला माहीत आहे का?🌱 झाडाला ...
09/01/2026

🌿 लपलेली उपासमार (Hidden Hunger) व अन्नद्रव्य कमतरता ओळखण्याची शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शिका

तुम्हाला माहीत आहे का?
🌱 झाडाला खत देणे म्हणजे फक्त खत टाकणे नाही,
तर झाडाची “भाषा वाचण्याची कला” आहे.

एका घटकाची कमतरता जरी झाली,
तरी झाडाची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था कोलमडते
आणि उत्पादनात धक्कादायक घट होते.

1️⃣ अन्नद्रव्यांची कमतरता म्हणजे काय? 🧪

झाड हे जिवंत सजीव आहे.
त्याला खालील मूलभूत क्रियांसाठी आवश्यक घटक लागतात 👇
प्रकाशसंश्लेषण
श्वसन
वाढ व पुनरुत्पादन
❌ जेव्हा एखादा घटक कमी पडतो,
तेव्हा झाडाची “कारखाना यंत्रणा” बिघडते
आणि खालील लक्षणे दिसू लागतात :

🔹 पाने पिवळी पडणे किंवा रंग बदलणे
🔹 झाडाची वाढ थांबणे / खुंटणे
🔹 पाने वाकडी होणे किंवा गळून पडणे
🔹 फळे लहान, कमकुवत व कमी वजनाची होणे

2️⃣ “लपलेली उपासमार” – सर्वात धोकादायक समस्या ⚠️
👉 ही समस्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा धोका आहे.

लपलेली उपासमार म्हणजे काय?
झाडात एखाद्या घटकाची कमतरता असते
पण सुरुवातीला डोळ्यांनी दिसणारी कोणतीही लक्षणे नसतात
परिणाम काय होतो?
झाड हळूहळू वाढत राहते
शेतकरी समाधानी राहतो
पण काढणीवेळी
❌ उत्पादन कमी
❌ फळांचा दर्जा खराब
❌ आर्थिक नुकसान

उपाय काय?
✅ लक्षणांची वाट पाहू नका
✅ माती परीक्षण (Soil Test) करा
✅ पानांचे / झाडांचे विश्लेषण (Plant Tissue Analysis) करा
👉 लपलेली उपासमार ओळखण्याचा हा एकमेव शास्त्रीय मार्ग आहे

3️⃣ अन्नद्रव्यांची कमतरता का निर्माण होते? (खरी कारणे) 🧐
ही समस्या नेहमी खत कमी असल्यामुळेच होत नाही 👇

🔹 मातीचा pH (आम्लता / क्षारता)
घटक मातीमध्ये असतो
पण pH जास्त किंवा कमी असल्याने
❌ तो “लॉक” होतो
❌ झाडाला शोषण करता येत नाही
🔹 घटकांचे धुऊन जाणे (Leaching)
वालुकामय जमिनीत
जास्त पाणी किंवा पावसामुळे
अन्नद्रव्ये मुळांच्या खाली वाहून जातात

🔹 माती घट्ट होणे (Soil Compaction)
घट्ट मातीमुळे
❌ मुळे श्वास घेऊ शकत नाहीत
❌ मुळे पसरत नाहीत
❌ अन्न शोषण होत नाही

🔹 असंतुलित खत व्यवस्थापन
एका घटकाचा अतिरेक
दुसऱ्या घटकाचे शोषण अडवतो
(उदा. जास्त नायट्रोजन → कॅल्शियम / पोटॅशियम कमतरता)

💡 “शेतकऱ्यांची वही” – यशस्वी खत व्यवस्थापनासाठी सल्ले
✅ पुढाकार घ्या
अंदाजाने खत देऊ नका
दरवर्षी माती परीक्षण = तुमचा दिशादर्शक (Compass)

✅ मुळांवर लक्ष द्या
मुळे निरोगी नसतील तर
महागडे खतही उपयोगी पडत नाही

✅ संतुलन ठेवा
लक्षात ठेवा 👇

❌ एका घटकाचा अतिरेक
= दुसऱ्या घटकाची कमतरता

🌾 निष्कर्ष
🌱 झाड उपाशी आहे की नाही हे
फक्त पान पाहून कळत नाही,
तर योग्य परीक्षणातूनच समजते.

योग्य समज + संतुलित खत
📈 जास्त उत्पादन
🍎 चांगला दर्जा
💰 जास्त नफा

 #श्राध्दाचा मानकरी कावळाच का ?   जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच  वृ...
21/09/2024

#श्राध्दाचा मानकरी कावळाच का ?

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान" होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते.

Address

Dombivli
421204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Garden Making posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category