Ganesh jadhav

Ganesh jadhav आमदार.विक्रमसिंह दादा समर्थक

आज महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील कन्नड भाषिक बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत बेळगाव येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सव...
13/03/2026

आज महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील कन्नड भाषिक बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत बेळगाव येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मिरज, गडहिंग्लज तसेच इतर भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांना शिक्षण, रोजगार, शेतीस पूरक सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांना दीर्घकाळापासून सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्नाटक शासनाच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशी यावेळी मागणी केली.

सीमाभागातील कन्नड भाषिक बांधवांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील काळातही ठोस प्रयत्न करत राहू.

#सीमाभागप्रश्न #जत

आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची राज्यसभेसाठी  #खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.दीर्घ राजकी...
07/03/2026

आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची राज्यसभेसाठी #खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
दीर्घ राजकीय अनुभव, समतोल विचारसरणी आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदान यामुळे पवार साहेबांनी देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे संसदेत महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांना योग्य न्याय मिळेल आणि राज्याच्या विकासाला सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास आहे. आगामी कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

05/03/2026

महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे उगाच बेळगाव महाराष्ट्र आहे म्हणून चालत नाही बेळगावच्या मराठी माणसासाठी काम केलं पाहिजे. त्यांना सोयी सवलती दिली पाहिजे.

शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत. आम्ही देवारात  महाराजांना पुजतो. महाराजांच्या पायाची धूळ म्हणजे आमच्या कपाळवरचा टिक्का आ...
28/02/2026

शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत. आम्ही देवारात महाराजांना पुजतो. महाराजांच्या पायाची धूळ म्हणजे आमच्या कपाळवरचा टिक्का आणि हे महाशय कोण जे महाराजांना अशाप्रकारे हा अंगावर हात टाकून घोषणा देतायत . दुर्दैवी आहे ज्या लोकांना आमच्या महापुरुषांची गरिमा समजत नसेल तर महाराजांच्या जवळही यांनी येऊ नये . 😡😡😡 निषेध.....

आज एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो 🤔 ५ किलो धान्य घ्यायला गेलो तर फिंगरप...
27/02/2026

आज एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो 🤔 ५ किलो धान्य घ्यायला गेलो तर फिंगरप्रिंट आवश्यक 🖐️ शेतकरी युरिया घ्यायला गेला तर फिंगरप्रिंट आवश्यक 🌾 पेन्शन घ्यायची असेल तरी फिंगरप्रिंट आवश्यक 👴👵 म्हणजेच आपल्या दैनंदिन प्रत्येक गरजेसाठी ओळख पडताळणी अनिवार्य आहे. लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार आणि यंत्रणा दक्ष असतात — आणि ते योग्यच आहे ✔️ पण प्रश्न असा आहे की देशातील सर्वात मोठी ताकद — मतदान 🗳️ — करण्याची वेळ आली की अशीच कडक व्यवस्था का नसते? जर प्रत्येक मतदान केंद्रावरही फिंगरप्रिंट आधारित प्रणाली लागू झाली, तर मतांची चोरी, बनावट मतदान आणि गैरप्रकारांच्या शंका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात 🚫 लोकशाहीची ताकद पारदर्शकता आणि विश्वासावर टिकून असते 🤝 जर तंत्रज्ञानाचा वापर रेशन आणि पेन्शनसाठी होऊ शकतो, तर निवडणूक प्रक्रियेत का नाही? हा कोणत्याही पक्षाचा प्रश्न नाही, तर व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा मुद्दा आहे 🇮🇳 अशा प्रश्नांवर विचार करणे आणि आपले मत स्पष्टपणे मांडणे हे आपले कर्तव्य आहे 💬 जर तुम्हालाही वाटत असेल की निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक असावी, तर हा विचार पुढे न्या, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही पोस्ट शेअर करा 🔁 लोकशाही मजबूत झाली, तर देश मजबूत होईल 🇮🇳✨

नवरा शिंदेसेनेचा आमदार  ……          बायको bjp प्रदेश उपाध्यक्ष.😅😜
26/02/2026

नवरा शिंदेसेनेचा आमदार ……
बायको bjp प्रदेश उपाध्यक्ष.😅😜

नुकत्याच पार पडलेल्या जत पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नूतन सदस्यांच्या आयोजित सत्कार सोहळ्या...
15/02/2026

नुकत्याच पार पडलेल्या जत पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नूतन सदस्यांच्या आयोजित सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून श्री. प्रमोद सावंत, सौ. संगीता सावंत, श्री. बसवराज घेज्जी, श्री. लक्ष्मण चव्हाण आणि सौ. शालन कोरे या सदस्यांचा सत्कार केला व सर्वांना पुढील लोकाभिमुख कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत रहा. जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यावर भर द्या माझी सोबत सदैव असेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
#सत्कारसमारंभ

जनतेच्या मनातील देशाचे भावी  #पंतप्रधान...🔥
13/01/2026

जनतेच्या मनातील देशाचे भावी #पंतप्रधान...
🔥

पंताचं कसंय मी नाय त्यातली अन कडी लावा आडण्याच्या आतली  #हे_वागणं_बरं_नव्हं
30/12/2025

पंताचं कसंय

मी नाय त्यातली अन कडी लावा आडण्याच्या आतली

#हे_वागणं_बरं_नव्हं

भाजपने अनेक उमेदवारांना EVM द्वारे निवडणूक सेट करण्याचं आश्वासन दिलं असल्याची चर्चा आहे त्यामुळे अनेक विद्यमान व माजी नग...
29/12/2025

भाजपने अनेक उमेदवारांना EVM द्वारे निवडणूक सेट करण्याचं आश्वासन दिलं असल्याची चर्चा आहे त्यामुळे अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांनी व इच्छुकांनी अनपेक्षितरित्या भाजप प्रवेश केलेला दिसून येतोय 🤔

नागपूर चा देवाभाऊ कधी मुंबई चा झाला कळलंच नाही...🤣🤣 आणी ह्याची कधी मुंबई झाली..🤣🤣👇🏻 #
27/12/2025

नागपूर चा देवाभाऊ कधी मुंबई चा झाला कळलंच नाही...🤣🤣 आणी ह्याची कधी मुंबई झाली..🤣🤣👇🏻
#

जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना कर...
15/12/2025

जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी संख येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक, संख येथे उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी सखोल संवाद साधला. ग्रामस्थांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेत या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

ग्रामस्थांच्या मागण्यांमध्ये तथ्य असून, हा प्रश्न केवळ संखपुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाशी निगडित आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून शासन स्तरावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

#संख #जत #संखस्वतंत्रतालुका #तालुकाविभागणी #आंदोलन

Address

Jath

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share