18/11/2018
साहेब बघता बघता सहा वर्ष उलटली पण अजुनही देहानं तुम्ही आम्हाला सोडुन गेला आहात. ह्यावर विश्वास ठेवायला मन धजावत नाही. नेहेमी वाटतं आता..आता बाळासाहेब बोलतील, सैनिकांना अादेश देतील, विरोधकांना 'ठाकरी शैलीत' सुनावतील, सामना मधे एखादा 'जळजळीत' अग्रलेख लिहितील. आणि मग पुन्हा एकदा आठवणींचे ढग दाटुन येतात अन् नकळत डोळे पाणावतात.
बाळासाहेब, मराठीमाणसांना पदोपदी आपली आठवण येत असणार हे नव्याने सांगायची गरज नाही. अर्थात, तुम्हालाही तुमच्या शिवसैनिकांशिवाय चैन पडत नसणार हे आम्ही जाणतोच.नेहेमीचं आकर्षण वाटावं असा असणारा तुमचा 'प्रभाव' आणि तुमचा 'दरारा' आम्ही कुठेतरी 'मिस' करतोय साहेबं!! म्हणुनचं तुम्ही असताना महाराष्ट्राकडे नजर टाकण्यासाठी देखील न धजावणारा धर्मांध ओवेसी आणि त्याची पिलावळ महाराष्ट्रात पसरु लागली आहे. त्या पिलावळीने केलेला नंगानाच दिसला की आठवतात त्या तुमच्या ठाकरी शैलीतील 'मार्मिक शेलक्या' आणि कणखर 'इशारे'. बाळासाहेब, तुमच्या पश्चात अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
देशातल्या आणि राज्यातल्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. तुम्हाला अपेक्षित असणारं भाजपाप्रणित सरकार दिल्लीत बसलं खरं पण सत्तेत बसताच त्यांचा नुर मात्र पालटला. महाराष्ट्रात ज्याप्रकारची वागणुक शिवसेनेला दिली गेली ती मराठी 'मनाला' आवडेलं अशी नव्हतीचं मुळी. पण भाजपाने केलेला हा 'दगाफटका' महाराष्ट्राच्या काळजाला 'चटका' देऊन गेला, हे मात्र निश्चित. बाळासाहेब, मध्यंतरी निवडणुका झाल्या.नेहेमीप्रमाणेचं 'सर्व पक्ष विरुद्ध शिवसेना' असाचं मुकाबला रंगला. पण साहेब ज्या मित्रपक्षाला तुम्ही शब्दशः अंगाखांद्यावर खेळवलेत, वाढवलेत तोचं शिवसेनेच्या मुळावर उठला. अशा सर्व विपरित परिस्थितीत देखीलं तुमचा 'लाडका उद्धव' ज्याप्रकारे लढला त्याला खरचं तोड नाही. लढवय्या पित्याचा 'वारसा' चालवण्यास आपण 'समर्थ' आहोत हे तुमच्या 'लेकाने' जगाला दाखवुन दिले. त्यामुळे तुम्ही लावलेल्या रोपट्याचं....
शिवसेनेचं भविष्य उज्वल आहे हे मात्र नक्की !! बाळासाहेब, काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या पण तुमचा 'वेडा' शिवसैनिक... तो मात्र अगदि पुर्वीसारखाचं आहे. तुमच्यावर कमालीची निष्ठा असणारा, कसलीचं लालसा नसणारा, ईमान सांभाळणारा... निरपेक्ष... लढवैय्या... अगदि तुम्हाला हवा तसाच! आणि तो अगदि शेवटपर्यंत तसाचं रहाणारं ह्यात दुमत असुचं शकत नाही.
बाळासाहेब, आज आपल्या पुण्यतिथिच्या पूर्वसंधेला आपणास हे लिहित आहे. आपल्या भेटीची ओढ असणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आपला 'सैनिक' शिवतीर्थाचा कोपरान् कोपरा व्यापणार ह्यात शंका नाहीच. उद्या शिवतीर्थावर निष्ठेचा आलेला महापुर आणि उभ्या महाराष्ट्राच्या पाणावलेल्या डोळ्यांमधे पुन्हा तुमचे 'दर्शन' होणार ह्यात दुमत नाही. चला, बाळासाहेब आता आवरतं घेतो. आता अश्रु आवरणं अशक्य होत चाललयं. उद्या आम्ही शिवतीर्थावर आपल्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन आपलं 'अधुरं स्वप्न पुर्ण' करण्यासाठी शपथबद्ध होऊन, 'आता रडायचं नाही, लढायचं' हा मंत्र घेऊन पुन्हा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं कामाला लागणार वचन आपणास देतो.
!!जय महाराष्ट्र !!
सौजन्य-अनामिक शिवसैनिक