Vayam Forest Nursery

Vayam Forest Nursery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vayam Forest Nursery, Nurseries & Gardening Store, A/p-:Kalse(Parabvadi), Kudal-Malvan Road, Dist-Sindhudurg, Malvan.

27/04/2025
13/03/2025
🌸 ताम्हण- महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आता वयम फॉरेस्ट नर्सरीमध्ये! 🌸ताम्हण (Jarul) म्हणजेच महाराष्ट्राचे गौरवशाली राज्य...
26/01/2025

🌸 ताम्हण- महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आता वयम फॉरेस्ट नर्सरीमध्ये! 🌸

ताम्हण (Jarul) म्हणजेच महाराष्ट्राचे गौरवशाली राज्यफूल, ज्याच्या मोहक जांभळ्या-निळसर फुलांनी निसर्ग अधिक सुंदर होतो..

वैज्ञानिक नाव: Lagerstroemia speciosa

वैशिष्ट्य: जांभळ्या-निळसर फुलांच्या घोसांनी निसर्गाला आकर्षक रूप देणारे वृक्ष.

ताम्हण (Crape Myrtle) हा एक आकर्षक व फुलझाडांचा प्रकार आहे जो भारतात विशेषतः दक्षिण भागात दिसून येतो. याला लॅगरस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे शास्त्रीय नाव आहे. ताम्हण मुख्यतः त्याच्या शोभिवंत फुलांमुळे आणि आकर्षक खोडाच्या पातळ व गुळगुळीत सालीमुळे ओळखला जातो.

ताम्हणची वैशिष्ट्ये:

फुले:
ताम्हणाच्या फुलांना नाजूक व लांबट पाकळ्या असतात, ज्या गुलाबी, जांभळ्या, पांढऱ्या किंवा कधी कधी लालसर रंगाच्या असतात.

फुलांचा बहार :- उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात व पावसाळ्यात भरभरून फुलते.

झाडाची उंची:
ताम्हण झाड 20-30 फूट उंचीपर्यंत वाढते, परंतु ते लहान आकारात ठेवण्यासाठी छाटणी करता येते.

पाने:
पाने टोकदार, लांबट असून हिरवी व चकचकीत असतात. हिवाळ्यात पाने पिवळी पडून गळतात.

खोड व साल:
ताम्हणाचे खोड गुळगुळीत असून त्यावर साल सोलल्यासारखी दिसते. त्याला सौंदर्याची एक वेगळीच छटा प्राप्त होते.

पर्यावरणातील महत्त्व:
ताम्हण मधमाश्या, फुलपाखरे, आणि इतर परागण करणाऱ्या कीटकांसाठी महत्त्वाचे झाड आहे.

लागवड व देखभाल:

माती: ताम्हण साधारण मुरमाड मातीमध्ये उत्तमपणे वाढते. चांगला निचरा होणारी माती आवश्यक आहे.

पाणी: मध्यम पाणी द्यावे; मुळे सडू नयेत याची काळजी घ्या.

सूर्यप्रकाश: पूर्ण सूर्यप्रकाशात चांगले फुलते.

छाटणी: फुले जास्त यावीत म्हणून झाडाची वेळोवेळी छाटणी करावी.

उपयोग:

सौंदर्य: ताम्हण झाड उद्यानात किंवा रस्त्यांच्या कडेला शोभिवंत झाड म्हणून लावले जाते.

लाकडी उपयोग: ताम्हणाची लाकडे टिकाऊ असतात आणि कधी कधी बांधकामासाठी वापरली जातात.

औषधी उपयोग: पारंपरिक औषधांमध्ये याचा उपयोग केला
जातो, विशेषतः सालीचा वापर काही आजारांवर केला जातो.

✅ 100% नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली रोपं.
✅ योग्य मार्गदर्शन आणि देखभाल तंत्रज्ञान.
✅ सेंद्रिय खतांची जोड.

संपर्क साधा:
📍 वयम फॉरेस्ट नर्सरी, माऊली मंदिर समोर , काळसे (परबवाडी), मालवण, सिंधुदुर्ग
📞 संपर्क करा: 9421163459

🌱 ताम्हणाची लागवड करा, निसर्गाचा वारसा जोपासा! 🌱

*रानमोडीचा नरकासूर‌*        'जागतिक वारसा स्थळ' सन्मान प्राप्त 'धामापूर तलावाला' शिवपूर्वकालीन जंगलाचा इतिहास लाभला आहे....
31/10/2024

*रानमोडीचा नरकासूर‌*
'जागतिक वारसा स्थळ' सन्मान प्राप्त 'धामापूर तलावाला' शिवपूर्वकालीन जंगलाचा इतिहास लाभला आहे.तेव्हापासून हे जंगल 'राखीव जंगल' म्हणून जपलं जात आहे.प्रादेशिक,दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ वनस्पतींचा अधिवास असलेलं हे जंगल,आता काही आक्रमक वनस्पतींनी ग्रासलं आहे.यामुळे जंगलातील लहान झुडपे,गवत,वेलींसहीत सर्व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.
*रानमोडी* ही अशीच एक आक्रमक वनस्पती. काही वर्षांपासून ती गावागावांत मोठ्या प्रमाणावर दिसू लागलीय. ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत जाते व इतर वनस्पतींना नष्ट करते. आपल्या गावातील जंगल,बागायती,शेती या वनस्पतीमुळे धोक्यात यायला लागल्या आहेत. त्यामुळे यापुढे कोकणातल्या प्रत्येकासमोर हे एक मोठं आव्हान म्हणून उभं राहत आहे.हिचा अटकावं करण्यासाठी तिला फुलोरा येण्याअगोदरच तिला मुळासकट काढून नष्ट करणे हाच एक पर्याय..
आपल्या सणांच्या माध्यमातून हे करता येणं शक्य आहे. नरकासुर म्हणजे वाईट शक्ती, जी सध्या आपल्याला या आक्रमक वनस्पतींमध्ये दिसून येते. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनातुन आपल्या पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या या वनस्पती नष्ट करणे हाच या रानमोडीच्या नरकासूराचा उद्देश. यावर्षी काळसे-धामापूर मधील 'वयम् फॉरेस्ट नर्सरी' व 'वनविभाग' यांच्या संयुक्त प्रयत्नातून याच वनस्पतीचा नरकासुर बनवण्यात आला. यासाठी काळसे-धामापूर राखीव जंगल,काळसे होबळीचामाळ या दोन ठिकाणी वाढलेल्या हानिकारक आक्रमक रानमोडीचे उच्चाटन करण्यात आले.वनविभागाच्या वतीने वनरक्षक शरद कांबळी आणि सहकारी अनिल परब यांनी आपले योगदान दिले.
जैवविविधता राखण्यासाठी फक्त 'वृक्षारोपण' नाही तर आक्रमक वनस्पतींचे 'उच्चाटन'ही तेवढेचं गरजेचं आहे.कारण वेली,गवत, झुडपे यांचे अस्तित्व असेल तरच जंगल परिसंस्था टिकून राहिल. 'वयम फॉरेस्ट नर्सरी' यासाठी दरवर्षी 'नरकासुर' आणि 'होळी' या सणांच्या माध्यमातून आक्रमक (Invasive species) प्रजातींना आटोक्यात आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलते आहे.पण यासाठी बरंच काम होणं गरजेचं आहे.हा त्रास कोकणातील सर्व गावामध्ये वाढत असल्यामुळे पुढील वर्षांपासून सर्वांनी या उपक्रमाचे अनुकरण करून या वनस्पतींपासून आपले गाव वाचवावे असे आव्हानही त्यांनी केले आहे.

परिसंस्थेचे पुनरुज्जीवन: काळसे-धामापूर मध्ये वयम फॉरेस्ट नर्सरी तर्फे स्थानिक आणि दुर्मिळ-सूचीबद्ध प्रजातींची वृक्षलागवड...
30/08/2024

परिसंस्थेचे पुनरुज्जीवन: काळसे-धामापूर मध्ये वयम फॉरेस्ट नर्सरी तर्फे स्थानिक आणि दुर्मिळ-सूचीबद्ध प्रजातींची वृक्षलागवड मोहीम...

आपण ग्लोबल वॉर्मिंगचे स्वरूप पाहिले तर जगभरात नैसर्गिक आपत्तींना वेग आल्याचे दिसत आहे. एकंदरित जगातील वातावरण बदलाचा विचार केला तर वातावरण बदलाचा परिणाम मानवी आरोग्य व पशूंच्या आरोग्यावरही होतो, हे सिद्ध झाले आहे. याच उद्दिष्टांना घेऊन काळसे गावातील प्रथमेश काळसेकर या तरुणाने उद्यमशीलता आणि पर्यावरण याची सांगड घालत वयंम फॉरेस्ट नर्सरीची सुरवात केली आहे. वयं फॉरेस्ट नर्सरीच्या माध्यमातून दर वर्षी प्रथमेश विविध उपक्रम आयोजीत करत असतो.

सामूहिक वृक्षारोपण हे सर्वात मोठं कार्य पार पडण्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यात जंगलातील स्थानिक दुर्मिळ झाडांची रोप लागवड हा एक महत्वाचा उपक्रम आहे. या वर्षी मालवण येथील स.का. पाटील महाविद्यालय, काळसे गावातील श्री शिवाजी विद्यालय या विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला. जागतिक वारसा प्राप्त धामापूर तलाव आणि सिंचनाखालील भूभाग वर्षानुवर्षे सदाहरीत असतात. पण काही ठिकाणी वृक्षतोड झाली असल्याने जमिनीची धूप होते. जमिनीची धूप रोखण्याच्या दृष्टीने या ठिकाणी समुद्रशिंगी, तीवर, सालंय, syzysium stocsii (अत्यंत दुर्मिळ प्रजाती), सप्तरंगी..इत्यादी प्रजातींची रोपे लावण्यात आली.

गावातील रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करून तापमान राखता येते. या दृष्टीने काही ठिकाणी ताम्हण, बहावा,मुचकुंद इत्यादी देशी शोभवंत झाडांची लागवड करण्यात आली.
वन्य प्राणी, पक्षी, मधमाशी यांच्या दृष्टीने रामफळ, पेरू, आंबा, जांभूळ इत्यादी प्रजातींची फळं झाडे लागवड करण्यात आली. यामुळे गावाच्या सौंदर्य मूल्यात वृद्धी होईल. उच्च दर्ज्याचे पर्यटन आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग होऊ शकतो .

या सर्व मोक्याच्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मिळून वृक्षारोपण केले. वयं नर्सरी आणि सिंधुदुर्ग वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा मान्यता प्राप्त धामापूर तलावाच्या भोवतालच्या राखीव जंगलामध्ये देखील वृक्षरोपण केले गेले. वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार, वनपाल श्री. श्रीकृषण परीट, वनरक्षक धामापूर श्री शरद कांबळी,वन कर्मचारी अनिल परब,वनवाहन चालक श्री राहुल मयेकर व काळसे-धामापूर ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

शिक्षणाय संस्था (भांडुप, मुंबई) आणि डॉ. मानसी सरपोतदार यांचे या वृक्षरोपण मोहिमेसाठी वयं फॉरेस्ट नर्सरीला आर्थिक पाठबळ दिले. तब्बल 45 प्रजातींची एकूण ३५० स्थानिक रोपं कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने वयम फॉरेस्ट नर्सरी मध्ये जोपासली गेली होती.

प्रथमेश काळसेकर (वयं फॉरेस्ट नर्सरी) : जैवविविधतेला जपणाऱ्या या प्रत्येक रोपाचं आपले एक वैशिष्ट्य आहे. मोनो कल्चर किती घातक ठरतं आहे हे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुभवण्यास येतं आहे.

श्री संदीप कुंभार (वन क्षेत्रपाल, कुडाळ) : समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी सामूहिक पद्धतीने स्थानिक वृक्ष लागवड करणे हि आता काळाची गरज आहे.

Address

A/p-:Kalse(Parabvadi), Kudal-Malvan Road, Dist-Sindhudurg
Malvan
416605

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919421163459

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vayam Forest Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vayam Forest Nursery:

Share