12/04/2024
वास्तु लेखनमाला लेख -3
नमस्कार!
माझ्या मागील लेखात आपण नवीन घर घेताना वास्तु का कराव? त्याचं नेमकं महत्व काय ? आपण हे पाहिलं,..त्या लेखात मी घरातल्या काही फॅक्टर्स चा उल्लेख केला होता ,.ते फॅक्टर्स म्हणजे प्रामुख्याने एंट्रन्स,लिविंग रूम,किचेन,वॉशरूम,बेडरूम.
ह्यांना आपण Primary Factors म्हणूया.
Secondary factors म्हणजे घरातील इतर गोष्टीची जागा, म्हणजेच स्टडी टेबल,वॉशिंग मशीन,शेगडी,मिक्सर,मेडिटेशन व्यायाम करण्याची जागा,हेल्थ कॉर्नर वैगैर.
तर वास्तु करण्या आधी सर्व साधारण घरात ह्या factors ची जागा ही त्या घराची कमी अधिक गुणवत्ता ठरवत...कस? तर आपण एक एक फॅक्टर्स च उदाहरणं घेऊन समजून घेऊ.
Primary Factors
एंट्रन्स:-
एंट्रन्स म्हणजे घराच प्रवेश द्वार.
म्हणजेच आवक- जावक ठरवणार घटक.
काय येणार,किती येणार आणि कस येणार हे घराच्या प्रवेश द्वारा वर अवलंबून आहे,.प्रत्येक दिशेतील प्रवेश द्वार हे त्या दिशे प्रमाणे कमी अधिक परिणाम देत असत म्हणून प्रवेश द्वार हे घरातील प्रमुख घटका पैकी एक आहे. साधारण पूर्व,ईशान्य,उत्तरे च प्रवेश द्वार शुभ मानलं जात. शुभ म्हणजे ह्या द्वारातून येणारी आवक ही चांगली असते,चांगल्या मार्गाने आलेली असते,इथे अपत्य चांगली घडतात,शिक्षण चांगल होत,एकंदरीत घराची ऊर्जा चांगली राहते,अश्या प्रकारे मूळ दिशा आणि उपदिशा ह्या मध्ये येणारे प्रवेश द्वार आणि त्यांचे वेगवेगळे प्रभाव ही असतात. त्यावर त्यांची गुणवत्ता ठरवली जाते.
प्रवेश द्वार आणि त्याची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवता येते. प्रवेश द्वार कुठे आहे,कोणत्या दिशेत आहे,हे पाहण्याची पद्धत वेगळी आहे,तेव्हा नुसताच अंदाज बांधून पूर्वे कडे,किंवा पश्चिमेकडे आहे असा समज करून घेऊ नये.पूर्व आणि पश्चिम ह्या पूर्ण विरुद्ध दिशा आहेत हे ध्यानात घ्यावे.
( बरेच लोक मला फोन वरच विचारतात की आमचं दार हे पूर्वे- पश्चिम आहे तेव्हा पूर्वे ला की पश्चिमेला असा प्रश्न विचारल्यास त्यांना सांगता येत नाही)
टिप:- कुठल्याही शास्त्राची अपुरी माहिती ही धोकादायकच,त्यामुळे वर वरच्या वाचनाने कुठल्याही निष्कर्षावर येऊ नये.माहिती हवी असल्यास तज्ञांना बोलवून त्यांच मत घ्यावे.
पुढील लेखात आपण पाहू लिविंग रूम ची माहिती.
वास्तु कन्सल्टट आणि रेकी मास्टर
शलाका आपटे.