Vastu Santosh

Vastu Santosh घर , दुकान, आॅफिस, कंपनी, शेत, आणि बरंच काही एकदा वास्तु परीक्षण करून घ्या, व सुख शांती समाधान मिळवा.

Vastu shastra (vāstu śāstra, also vastu veda and vastuvidya, "science of construction", "architecture") is an ancient doctrine which consists of precepts born out of a traditional view on how the laws of nature affect human dwellings.

28/06/2023

🕉️ *स्तोत्र मंत्रांची गरज का आहे?*

*एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे.*

*मग मानवी मेंदू तर त्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. तोही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो "हार्मफुल साईट्स" अर्थात जागा जसे की स्मशान, काही दूषित जागा, बाधीत व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक ऊर्जा वगैरेच्या संपर्कात आपण जातो.*

*आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये (दोष येऊ नये आपले तेजोवलय (Aura)दुषित होऊ नये) म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो?*

*अर्थातच*......
*आपण म्हणतो ते स्तोत्र ,मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस... मंत्रांचा अर्थ समजला काय किँवा न समजला काय... काही हरकत नाही. कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?*

*पण ज्याला समजते, त्याने सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो... समजो अथवा न समजो, ते काम तर व्यवस्थित होते.*

*मंत्र, स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ- संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...*

*जसे सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पी सी असतात त्यांना स्ट्राँग अँटी व्हायरस लागतो... तसेच विशेष साधना करणार्‍या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावंच लागतं.*

*एव्हाना पी सी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र, मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल...*

*त्या क्षेत्रातील तज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा. एवढंच आपण करत रहावं. मग चिंता नाही.*

*आणि दुर्लक्ष करत गेलो, तर एकवेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं. पण शरीराला, मनाला फॉर्मेट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी....*

*शेवटी काय?...*

*रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरुंने दिलेले नामस्मरण, नित्यसेवा केली, तर हार्मफुल साईट्सला ( दूषित ठिकाणी)भेट देताना आपलं संरक्षण, शुचिर्भूतता सांभाळली, की आपलं शरीर, मन नक्कीच छान, सुरक्षित राहील.*

🌹🕉️ *गुरूदेव दत्त*🕉️🌹
🌹 *ओम काळभैरवाय नमः* 🌹

13/07/2021
29/12/2020

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया!

23/10/2019

॥ लक्ष्मीपूजन २०१९ ॥

यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ (रविवार) सायंकाळी ६ वाजून ७ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३७ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही शुभ व अमृत चौघडी असल्याने संपूर्ण काळ शुभ आहे. सुक्ष्म पध्दतीनुसार त्यातही "संध्याकाळी ६.०७ ते ०७.४१" हा काळ अधिक अनुकूल व शुभ आहे.

या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)....मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका...नुसते मानसिक स्मरण केले किंवा ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे....पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा....जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा....ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत ही विनंती (महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत)

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत

१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)

२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:

३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात

४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा

५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:

६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:

७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे
...तर मित्रांनो अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. पोस्ट पब्लिक पोस्ट आहे त्यामुळे कॉपी-पेस्ट न करता सबंध पोस्ट शेअर करा. आपल्या सर्व बंधुभगिनींना, आप्तेष्टांना मार्गदर्शन होवुन सर्वत्र समृध्दीचे, समधानाचे वातावरण पसरावे हीच श्रीलक्ष्मीनारायणांच्या चरणी प्रार्थना....

#लक्ष्मीपूजन

शुभ सकाळ मित्रांनो
23/09/2018

शुभ सकाळ मित्रांनो

17/03/2018

*उद्या शनिवार दिनांक १७/०३/२०१८ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे....धन्यवाद.... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो... चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमाकरा...... ज्यांच्यामुळे* *माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मन:पुर्वक आभार!*
*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. दिनांक १८/०३/२०१८ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

21/01/2018

उंबरठ्याचे महत्व

वास्तूशास्त्रानूसार , घराच्या मूख्य प्रवेशद्वाराजवळील उंबरठ्याला फार महत्व आहे
घराचा उंबरठा हा पृथ्वी , सौर , व चांद्र उर्जेचं संतूलन राखतो , फक्त तो वास्तूशास्त्राप्रमाणे असेल तर घरातील व्यक्तींना सुपरिणाम मिळवुन देतो
घराला असणारा हा उंबरठा कमी खर्चाचा असून घरातील व्यक्तींना भाग्योदय करून देणारा असतो
पॉझेटिव व निगेटिव अशा दोन प्रकारच्या उर्जा असतात,लश्मी हे वैश्विक उर्जेचे पॉझेटिव एनर्जी असते , हि एनर्जी ज्या मूख्य दरवाज्यातून आत येते तीकडे विषेश लक्श पूरवावे
लश्मी घरात येणे म्हणजे योग , शेम , आयु , कल्याण , मांगल्य या पंच परमष्रेश्ठीची प्राप्ती होते , भाग्यकल्प होतो
मुख्य दरवाजा घराचे मुख आहे , जर मुख अस्वच्छ , जंन्तूसंसर्गाचे असेल तर काय दूषित उर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य टिकवू शकेल का?
हिन्दु परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलय .
उंबरठ्याशीवाय घराची चौकट पूरी होत नाही .
उंबरठ्याने एक सीमारेषा तयार होते.
वास्तुपुरूष डिफाईन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा त्रास होत नाही.
दरवाजा चौकोनीच असावा .
उंबरठ्याने त्याची चौकट पूर्ण होते . अर्धवर्तूलाकारात दरवाजा नसावा . अशा घरात कन्याजन्म प्रमाण| जास्त असते व दरवाजा त्रीकोणी असेल तर घरात स्री ला पीडा उद्भवते.
उंबरठा हा चांगल्या प्रतीचा, लाकडाचा असावा.
लाकुड एकाच प्रतीचे पुल्लींगी झाडाचे वापरावे.
दरवाजाला दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं व उजव्या बाजूचं कवाड लहान असाव . डांव कवाड मातृ कवाड व उजव कवाड पुत्रीका कवाड अशी संञा आहे.
दरवाजा प्रमाणबध्द असावा दरवाजा उघडताना अडकणारा , आवाज करणारा , बुटका किंवा अति उंच , फुगलेले , पातळ , कललेल , तिरके , डाग पडलेले, भेगा पडलेले ,रंग उडालेलं असू नयेत.
१) बृहत्संहिता ग्रंथात म्हटलय की , दरवाजा प्रमाणापेक्शा उंच असेल| तर शासन भय , प्रमाणापेक्शा कमी असेल तर चोर भय व दुःख देतो
२) मध्यभागी ( ओव्हल आकासारख्या विस्तृत असेल तर हाव वाढवतो . उघडण्यास कठीण ( कुब्ज ) असेल तर कूलनाश होतो . अतिपीडीत उंबरास टेकणारा असेल तर गृहस्वामीला पीडा करतो .
घराच्या दिशेने त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यू सारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेने कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करायला
लावतो

वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.

वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतोच. बहुतेक गावात एक पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. उंबराचे झाडही आपण पवित्र मानतो.

नृसिंहानी हिरण्यकश्यपुचा वध केला तेंव्हा नृसिंह अत्यंत क्रोधीत झाले होते, काहि केल्या त्यांच्या शरीराचा दाह कमी होत नव्हता, उंबराच्या फळामध्ये नखे रोवल्यानंतरच त्यांचा क्रोध हळू हळू कमी होऊन नृसिंहस्वामी शांत झाले.

उंबराच्या फळामधील शांतरसाच्या गुणधर्मामुळेच उंबरठ्याची संकल्पना आली. घरातील प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश करताना, उंबरठा ओलांडल्याने त्याचे मन शांत व्हावे , घरात शांतता प्रस्थापित व्हावी, सकारात्मक उर्जा प्रस्थापित व्हावी हि खरी या मागील संकल्पना आहे.

उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.

उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे. गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून उंबराची फळे खावीत. हे फळ खाल्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही.

उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे. सध्या उंबरठ्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरण्यात येते. काहि जण लाकडा ऐवजी फरशी बसवितात, हे काही योग्य नाही असे मला वाटते.
❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄

13/11/2017

good morning dost

09/10/2017

वास्तु शास्ञ कोणासाठी ? प्रत्तेक घरासाठी घरातील सर्वासांठी !!!

Address

Mumbai
400068

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vastu Santosh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vastu Santosh:

Share