27/09/2016
विदर्भातील जनतेवर सर्वप्रकारे अन्याय झाला आहे. हे आपनास नव्याने सान्गन्याची तशी काही गरज नाही. पण आज इथे मी आयटी क्शेत्रात झालेल्या अन्याया बद्दल बोलणार आहे. आपण म्हणाल अन्याय कसला? तर तो असा, विदर्भात एकुन ११ जिल्हे आहेत. नागपुर,भन्डारा,अमरावती,अकोला,बुलढाना,वाशिम,चन्द्रपुर,गडचिरोली, यवतमाल, वर्धा, आणी गोन्दिया. या ११ जिल्ह्यातुन लाखो आयटी इन्जिनियर्स आतापर्यन्त बनलेत. पण, त्याना इथे विदर्भात रोजगार उपलब्ध नाही.कारण इथे आयटी कम्पन्याच नाहित. असतील त्याही बोटावर मोजन्या इतक्याच. आणी त्याला फ़ारसा अर्थही नाही. मी इथे हाच प्रश्न विचारु इच्चितो कि असे का? या भागातुन एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्जिनियर्स असुन देखिल आजपर्यन्त महाराष्ट्र सरकारने इथे कम्पन्या का आणल्या नाहीत? का इथे जागा उपलब्ध नाही? की आणखी काही? उत्तर द्या. सर्व प्रकारे उत्तम असनार्या विदर्भाला जानुन बुजुन मागे ठेवन्यात आलय,आणी आताही ठेवल जातय. इथल्या विद्यार्थ्यान्चा एकच मार्ग निश्चित झालेला आहे. खुप अभ्यास करायचा अभियन्त्रिकि शिक्शन घ्यायच आणि नोकरी साठी पुणे, मुम्बई किवा बेन्गलोर ला जायच. पण का जायच?? "का नागपूर आणि अमरावतीत आयटी कम्पण्या नाहीत" प्रश्न तसा भावनिक आहे. आपण लहानाचे मोठे ज्या भुमीत झालोय.ज्या वातावरणात आपली जडणघडन झाली आहे. ती जागा आपण नोकरी निमित्त्याने कायमची सोडुन द्यावी? विदर्भात जागा, पाणी, विज या तिनही गोष्टी उपलब्ध असताना केवळ राजकिय स्वार्था पोटी आप-आपल्या मतदार सन्घाचा विकास करणार्या नेत्याना मला जाब विचारायचा आहे. पुण्या मुम्बईत असनार्या प्रत्येक वैदर्भिय इन्जिनियर्च्या मनात आज हा प्रश्न आहे की, एक स्वतचा फ्ल्याट विकत घेन्यासाठी अवघ आयुश्य घालवण्या पेक्शा त्याच्याच भागात म्हणजे विदर्भात जर त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध असता तर.. तोही "त्याच्या राह्त्या घरी सुखाने चार घास त्याच्या कुटुम्बीयानसोबत खाउ शकला असता." आज तिकडे त्याचे आई-वडील मुलाला उच्च शिक्शण देउन एकटे पड्ले आहेत. मुलगा/मुलगी आपल्या जवळ रहावे असे त्यानाही वाटते पण काय कराव? या शासनाने त्यान्च्या मुलानसाठी तशी रोजगाराची सोयच इथे केलेली नाही. मुलगा दोन दिवसासाठी सुटीत गावी आले असताना घरी जशी दसरा दिवाळी असल्या सारख वाटत. पण तेच दोन दिवसानन्तर त्यान्च्या परतिच्या प्रवासावेळी आई-वडील, भाउ-बहीण यान्च्या डोळ्यातील आसवे थाम्बत नाहीत. कसातरी आव आणून मुलगा-मुलगी पाणावलेल्या डोळ्यान्नी पुण्या मुम्बई ला जायला निघतो. काही दुर गेल्यावर आईचा फ़ोन येतो,"बाळा व्यवस्थीत बसलास न? सामान वगैरे बरोबर आहे न ? जेवन करुन घे." तेवढ्यात मुलगा विचारतो "आई तु जेवलीस का?" आई तिकडन हळु आवाजात म्हणते "जेवायची इच्चा नाहीरे बाळा आज." मुलगाही आईला न जेवण्याच कारण विचारत नाही. कारण त्याला माहिती असत... कुण्या आईच लेकरु तिच्या पासुन दुर गेल्यावर तिला काय जेवावस वाटनार? तरी तो म्हणतो "आई तु जेउन घे आणि बाबाना पण जेवायला लाव" न राहवता आईच्या तोन्डुन शब्द निघतात "तु गेल्यावर बाबा ढसा-ढसा रडलेत रे आज" सान्गा त्या मुलाची काय अवस्था होत असेल अश्या वेळी, ज्या बापाने आपल्याला लहाणाचा मोठा केला, जिवनातील प्रत्येक प्रश्नाला खम्बीररीत्या सामोरा गेलेला माणुस आज आपल्यासाठी पार रडतोय. यापेक्शा ह्रुदय हेलावनार काय असेल? लहान भाउ चिन्टुला फ़ोन दे म्ह्टल्यावर कळते की तोही दादा पुण्याला गेला म्हणून न जेवताच झोपी गेलाय.. बस्स, यापुढे काही बोलायची इच्चाच होत नाही. आपला गहीवरलेला आवाज आईला ऐकु जाउ नये म्हणुन मुलगाच फ़ोन कट करतो.. आणि तोही नन्तर हुन्दके आवरु शकत नाही.. काही वेळाने स्वतच आपले डोळे पुसतो आणि विचार करत करत झोपी जातो..का आपल्या नशीबी घरच्यान्सोबत रहाणे नाही का ?? का पुण्या-मुम्बईत स्वतच घर असनार्या लोकान्सारख आपणही सन्ध्याकाळी ओफ़िस मधुन आल्यावर ब्याग आपटुन आई मला भुक लागली काहीतरी खायला दे नाही म्हनु शकत?? आपल्या नशिबी का ती दुसर्या तिसर्या मजल्यावर असनारी भाड्याची भकास,उदास आणि आपल्या जिवलग कुटुम्बियान्च्या पोकळीची सतत जाणिव करुन देणारी खोली?? पुण्या- मुम्बई सारख्या गर्दीतल्या शहरांत राहून देखील आम्ही एकट पडलोय.लाखोन्चे प्याकेज असतानाही हे पैसे गावाकडच्या आपल्या घरातील जिथे आपले कुटूम्बीय आहेत त्या घरातील लाड मुळीच पुरवू शकत नाहीत.....
मित्रान्नो आवडला असेल तर नक्की शेअर करा.. जाउद्या त्या मुम्बईत बसलेल्या मन्त्र्यानपर्यन्त. एखाद्याच्या काळजाला आपल्या जखमेची वेदना जाणवलीच तर करतील काहीतरी विदर्भात... नाही तर आपल्या दोन-दोन दिवसान्च्या तोकड्या सुट्ट्या आहेतच...