19/05/2023
पर्यावरण
या विषयाबाबत अनेक जण अनेक वेळा बोलतात परंतु त्या अनुषंगाने कृती करणे व त्या कृतीत सातत्य ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय म्हणजे अर्धवट गोष्ट किंवा उपाय आहे. आपणास माझ्या या म्हणण्याचे अतिशय आश्चर्य वाटले असेल परंतु झाडे लावणे हा उपाय असून ती झाडे सांभाळणे त्याचे संगोपन करणे या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच तो उपाय पूर्ण होतो. परंतु आपल्याकडे फक्त झाडे लावणे एवढेच ध्यानात घेतले जाते त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
हा विषय निवडण्याचे मुख्य कारण मी माझी मेहुणे श्रीमती शरयू फडके हिच्याकडे नाशिकला गेलो होतो त्यावेळेस मला तिचे दीर संजय फडके हे त्यांच्या जागेतील प्लॉटमध्ये बाग काम करत असताना दिसले श्री संजय फडके यांचे वडील यांनी तेथे दोन एन ए, बिन शेती, प्लॉट घेतले होते व त्यातील एका प्लॉटवर राहण्यासाठी इमारत बांधली व दुसऱ्या प्लॉटमध्ये बाग लावली ही गोष्टच अतिशय आश्चर्याची असून एन ए, बिनशेती, झालेल्या मिळकती उत्पन्नाचे साधन म्हणून वापर करणे हे सर्वसामान्य आहे परंतु अशा प्लॉटचा वापर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्री संजय फडके यांच्या वडिलांनी केला याचाच अर्थ सदरची बाबत अतिशय कौतुकास्पद असून समाजाचा व सामाजिक गोष्टींचा विचार करणारी आहे. आज प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावत आहे परंतु श्री संजय फडके यांच्या वडिलांनी उत्पन्नाचा विचार न करता सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे व त्या अनुषंगाने त्यांच्या हयातीत त्यांनी या प्लॉटवरील बाग जोपासली व फुलवली ही गोष्ट मला माहित होती.
वडिलांनी घेतलेला सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांची मुले पुढे नेतात असे क्वचितच घडते ती गोष्ट या ठिकाणी घडली संजय फडके यांनी ही बाग वडिलांनंतर जोपासायला व फुलवायला स्वतः सुरुवात केली असे आज आढळून आले. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी म्हणून हे करत असल्याचे सांगितले तसेच स्वखर्चातून याची निगा राखणे जोपासणे या गोष्टी ते आजही करीत आहेत. या गोष्टीचा विचार करता फडके हे कुटुंब पैशाच्या हव्यासापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजही झाडे लावत आहे व ती सांभाळत आहे व या सर्व गोष्टी ते स्वखर्चाने करीत आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा व हेच ते आपल्या कृतीतून या समाजाला सांगत आहेत. आज या मिळकतीची किंमत करोडो मध्ये आहे परंतु फडके फॅमिली पैशाला महत्त्व न देता सामाजिक बांधिलकीला महत्त्व देत आहेत. त्यांच्या या कृत्याबद्दल, त्यांच्या या सामाजिक बांधिलकी बाबत, त्यांना व फडके फॅमिली ला मानाचा मुजरा.