22/02/2025
#अति_झालं_हसू_आलं
सिविल हॉस्पिटल आणि पोस्टमार्टम विभागाचे तीन तेरा वाजले असताना, त्यात सुधारणा करणारी "स्पोर्टी ऍक्टिव्हिटी" दोन्ही डॉक्टरांनी मिळून करायचं दिल सोडून, तुम्ही ही फ्री स्टाईल कुस्ती खेळून हीच खरी गावठी रस्त्यावरची आमच्या खऱ्या वृत्तीला शोभणारी,
"स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी" आमच्या खऱ्या गुणांना कसा वाव देते ?? हेच तुम्ही या रावडी मारामारी दोघांनीही सिद्ध केलं आहे. धिक्कार आहे तुमच्या दोघांच्या या मारामारीचा. "डॉक्टरांनो आम्हाला तुमची लाज वाटते."
मारामारी झाली म्हणजे?? एक हजार टक्के 1000% दोघांचाही दोष असणारच. एका हाताने टाळी अजिबातच वाजत नाही. या मागची कारणे लाख असतील. कारणे गेली झोऱ्यात. दोघेही डॉक्टर आहेत हे महत्त्वाचे. असे करताना त्यांना हजार वेळा लाज वाटायला पाहिजे होती. त्यात तर एक सिविल सर्जन आहे आणि दुसरा पोस्टमार्टम विभागाचा आहे. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी साठी एकत्र ते जमले होते. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी शासन का बर प्रमोट करत?? कर्मचारी आणि अधिकारी नव्या जोमाने कामाला लागावेत, त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती जोपासली जावी आणि ती वाढावी, हा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ठेवण्यामागचा मूळ उद्देश आहे ,होता आणि असेल.
सद्यस्थितीत सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि हे डॉक्टर्स नागरिकांच्या सेवा त्यांना देण्यात सपशेल 1000% नापास आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चा हा लाड, आता शासनाने बंदच करावा. नका करू यांचे हे फालतू आणि फाजील लाड. हे भ्रष्ट आहेत आणि काम चुकारही आहेत. "जनतेचे आपण नोकर आहोत." जनतेची सेवा करण्यासाठी ही जागा ही नोकरी आपल्याला मिळालेली आहे. ही भावनाच दोघाही डॉक्टरांची संपल्यामुळेच, तसेच जनते प्रति त्यांची असायला हवी ती बांधीलकी सुद्धा संपल्यामुळेच या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ताबडतोब बंद कराव्यात, जनतेचा अहोरात्र काबाड कष्ट करून मिळवलेला टॅक्सचाच पैसा वाचवावा.
लाजा वाटायला पाहिजे, आपण रस्त्यावरील भाई, गुंड आणि मवाली यांच्यासारख्या मारामाऱ्या करतो. आपण डॉक्टर आहोत की कसाई ?? असा प्रश्न या मारामारीतून दोन्ही डॉक्टरांनी स्वतःच स्वतःच्या पुढे निर्माण केला आहे. मनोभावे रुग्ण सेवा करायची, त्यात पारदर्शकता आणायची, त्यात वेग आणायचा, सेवेत सुधारणा करायची, भ्रष्टाचार बंद करायचा, कामचुकारी बंद करायची हे वैद्यकीय सेवा असल्याने या सेवा द्यायच्या सोडून, हे काय भलत सलत या डॉक्टरांनी केलं?? या सेवेत आलेला धंदा, काळा धंदा, भ्रष्टाचार कायमचा नष्ट करायचा आणि या ऍक्टिव्हिटी म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणून खरंतर आता मोजल्या जाव्यात तशी वागण्याची गरज असताना तसे न वागता, लाखो रुपये खर्चून मैदाना वरच्या या खऱ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कसल्या घेता?? कशाला घेता?? आज काळाची गरज, रुग्णसेवा फक्त रुग्णसेवाच देण्याची खरी गरज आहे.
डॉक्टर आम्हाला तुमची लाज वाटते?? दोघांवर शासनाचा लाखो रुपयांचा पगार खर्च होतोय. दोघांकडून प्रामाणिक, पारदर्शक आणि वेगवान रुग्णसेवा अपेक्षित आहे. तसं व्हायचं राहूनच गेलं, पण ही भलतीच भाईगिरी, गुंडागर्दी, टगेगिरी, मवालीगिरी आणि माफीयागिरी , या डॉक्टरांकडून बघायला मिळणं, हे तमाम नाशिककर हे जनतेचे दुर्दैव आहे. ही दबंगगिरी त्यांनी रुग्णसेवेत दाखवावी. तरच हे खरे डॉक्टर. नाहीतर म्हणतात ना सरकारी डॉक्टर म्हणजे कामचुकार आणि फक्त भ्रष्टाचारीच असतात, हे वाक्य हे दोघे 100% खरंच करून दाखवत आहेत. आता तरी सुधरा रे... डॉक्टरांनो. सुधरा रे. तुमच्यापेक्षा दहावी नापास ड्रग्स, दारू, इतर नशा, गांजा, गुडगुडी, एमडी घेऊन बेफाम झालेले, जबाबदारीचे भान नसलेले मारामाऱ्या करतात, ते बरे वाटावेत अशी परिस्थिती तुमच्या या घाणेरड्या प्रकारच्या मारामारीने झाली आहे.
स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुमच्या बापाने भरवल्यासारखे, माज करत, अगदी बॅटने मारामाऱ्या करताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत रे?? या शिक्षणामुळे तुमच्यात काही बदल झाला असावा, हा भाबडा आशावाद आज सपशेल पराभूत झाला. येथे ओशाळला डॉक्टर....
हरामखोर डॉक्टरांनो तुम्ही सुद्धा अशी जीवघेणी फ्री स्टाईल मारामारी करू शकता?? याची आम्हाला लाज वाटते. झोपडपट्ट्यांमध्ये राहून तणावग्रस्त होऊन नागरिक एकमेकात मारामाऱ्या करतात, इथपर्यंत समजू शकते, पण स्वतःला उच्चविद्याविभूषित समजणारे इतकं हीन आणि नीच पातळीवरचं मारामारी पर्यंतच काम करू शकतात?? याचमुळे शिक्षणावरचा विश्वास कमीकमी होतो आहे. नशीब कोयते घेऊन मारामाऱ्या केल्या नाहीत. नाहीतर "कोयता डॉक्टर गॅंग" अशी बिरूदावली मिरवण्याची वेळ तुमच्यावर आली असती.
डॉक्टर तुम्ही सुद्धा????? डॉक्टर प्रोफेशनची "नोबल प्रोफेशन" अशी वापरली जाणारी संज्ञा तुम्ही उकिरडा करून टाकली. शेम शेम शेम शेम शेम शेम. कोणत्या तोंडाने या मारामाऱ्या तुम्ही तुमच्या मुलांना कशा बरोबर आहेत ?? हे समजून सांगणार आहात?? हे जरा आता इतरांनाही सांगा. इतर नागरिकांच्या मारामाऱ्यांमध्ये सिविल हॉस्पिटलच्या कागदपत्रांमध्ये जे घोळ होतात, पोलीस तक्रारीत जे घडवतात, ते तरी आता या मारामारीत करू नका. खरं काय ते जनतेसमोर आणा. या मारामारी मधील पारदर्शकता आणि त्याच्या मागची कारणे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेसमोर सादर करा. तर आणि तरच ही गेलेली अब्रू वाचली तर वाचली. या माध्यमातून तुमच्या मनगटातील आणि पार्श्वभागातील खरा जोरही या निमित्ताने दाखवा. प्रामाणिकता कशाशी खातात ?? हेही या माध्यमातून सिद्ध करा. चांगली संधी आली आहे. तुम्ही स्वतःच निर्माण केली आहे. डॉक्टरांनो या संधीचा फायदा घ्या. घाणेरडा झालेल तुमचं "वैद्यकीय क्षेत्र" या निमित्ताने स्वच्छ करा.
डॉक्टर तुम्हीसुद्धा???