Lokesh saraf

Lokesh saraf Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokesh saraf, Well water drilling service, Osmanabad.

29/11/2024
29/10/2024
29/10/2024

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त आपल्या जीवनात सुख-समृद्धी नांदो व भगवान धन्वंतरी आपणास आरोग्यरूपी 'धन' प्रदान करो हीच सदिच्छा!

#धनत्रयोदशी

18/10/2024
17/10/2024

महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

रामायणासारख्या महाकाव्यातून संघर्ष, न्याय, कर्तव्य, सत्य, त्याग, आस्था आणि प्रेमाचा संदेश त्यांनी दिला..

श्री प्रभू रामचंद्र यांचे जीवन मांडताना समस्त मानव जातीला त्यांनी जीवनाचा गर्भित अर्थ सांगितला आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारून त्याचा प्रसार करण्याचा संकल्प करूया..

#महर्षी #वाल्मिकी

17/10/2024

भाजपा आणि महायुतीच्या सर्व नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..

राज्याच्या हिताचे अधिकाधिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून व्हावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!

Chitra Wagh Vikrant Patil Dr. Manisha Kayande - डॉ. मनीषा कायंदे Hemant Patil - हेमंत पाटील

17/10/2024

#नळदुर्ग: राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न मिटला : महायुती सरकारने विशेष बाब म्हणून घेतला निर्णय!

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे साकारल्या जाणार्‍या राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेसाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नळदुर्ग पालिकेची स्मारकासाठी असलेल्या ६ एकर जागेच्या आरक्षण बदलाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच ५ कोटी रूपयांचा निधी बसव सृष्टीसाठी उपलब्ध झालेला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राज्यातील पहिली भव्यदिव्य आणि आकर्षक बसवसृष्टी आकाराला येणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बसवसृष्टी उभारण्यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लावून धरली होती. याविषयी आपण सातत्याने पाठपुरावा करून नळदुर्ग जवळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेली वाहनतळासाठी आरक्षित जागा बसवसृष्टीसाठी मिळावी याकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.

नळदुर्ग शहराचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या ६ एकर जागेवरील आरक्षण बदलून बसवसृष्टीसाठी देण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने या ६ एकर जागेसाठी विशेष बाब म्हणून आरक्षण बदलून देण्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली होती.

आपल्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून या जागेवर बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक स्मारकासह विस्तृत उद्यान उभारण्यासह इतर अनुषंगिक बाबीसाठी १०% जागेवर बांधकाम करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने एकूण ६ एकर असलेल्या या जागेतील ५ एकर क्षेत्रावर महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा अश्वारूढ पुतळा, ध्यानकेंद्र, आकर्षक बागबगीचा, सुशोभिकरण, त्याचबरोबर लाईट अ‍ॅन्ड साऊंड-शो करण्याचे ठरविले आहे.

राज्यातील पहिली आकर्षक भव्यदिव्य अशी बसवसृष्टी या ठिकाणी आकाराला येणार आहे. तर उर्वरित १ एकर क्षेत्रावर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे समारक आणि उद्यान विकसित केले जाणार आहे. हे ठिकाण एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याचाही उद्देश आहे.

लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद.

#बसवसृष्टी #नळदुर्ग

15/10/2024
15/10/2024

थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

डॉ.कलाम यांचे अंतराळ संशोधनातील कार्य हे देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मैलाचा दगड आहे. कष्ट, प्रामाणिकपणा, विज्ञानावरील निष्ठा आणि आपल्या साध्या जीवनशैलीतून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचा प्रत्येक गुण आज युवकांनी आत्मसात करण्यासारखा आहे..

#अब्दुल_कलाम #जयंती

08/10/2024

Address

Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokesh saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share