29/04/2017
किल्ले तिकोनाचे एक अप्रतिम छायाचित्र !
पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या
दुर्गचौकडींची मोठी दहशत होती.
या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता
येणारा असा तिकोना किल्ला! पावसाळा सुरू झाल्यावर या
साऱ्या मुलखालाच नवी झळाळी येते. मावळातल्या
डोंगरवाटांवर पाय उमटवायला आणि सगळा पवन मावळ मनात
साठवायला हाच उत्तम काळ!
पवन मावळ! बारा मावळांपैकी एक. लोणावळय़ाच्या दक्षिणेकडे
सहय़ाद्रीत उगम पावणाऱ्या पवना नदीचे हे खोरे. या नदीवर १९७५
मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला. अशा या पवन
मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या
दुर्गचौकडींची मोठी दहशत होती. या चौकडीतीलच आपल्या
विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना
किल्ला!
पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून पंधरा किलोमीटरवर पवना
धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत
तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच
किलोमीटरच्या चालीवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड-
कोळवण-काशिग मार्गेही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी
पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची बस सोयीची.
याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही
एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या
पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरत तिकोना जवळ करता
येतो.
समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवर असलेल्या या
गडाचा माथा त्रिकोणी आकाराचा असल्याने याचे नाव
तिकोना! याला ‘वितंडगड’ असेही दुसरे नाव आहे, पण ते कानाला
तितकेसे गोड वाटत नाही.
काळे कॉलनी मार्गे गडाकडे येऊ लागलो, की तिकोन्याचा हा
त्रिकोणी आकारच प्रथम लक्ष वेधून घेतो. त्याचे ते आकाशाला
खेटलेले कातळी रूप पाहून नवख्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकून
जाते. पण शेतीवाडीतून, भाताच्या खाचरांतून निसर्गाशी नाते
जोडत पायथ्याच्या तिकोना पेठेत येईपर्यंत गडाशी असलेले मैत्र घट्ट
होते आणि मग हे आव्हानही सोपे वाटू लागते.
तिकोना पेठ! बहुतेक गडांना इतिहासकाळापासून असणारी अशी
ही गडाची बाजारपेठ! आज मात्र इथे डोंगरउतारावरील चार
घरांची वस्ती आहे. इथून गडाचा दगड ना दगड स्पष्ट दिसतो. या
गडावर जाण्यासाठी काशिग, घेवंड आणि पायथ्याच्या
तिकोना पेठ या तीन वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही
वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. तिकोना
पेठेतून गडावर दोन वाटा चढतात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी
लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी.
पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या ‘पालथा
दरवाजा’तून माचीवर प्रवेश होतो. #किल्ला #शिवइतिहास #शिवशाही #शिवराय