HoneyRoots Garden Care Services,Pune

HoneyRoots Garden Care Services,Pune All types of organic fertilizer and organic manure

22/12/2025

*बागकाम एक कला*
*भाग - २ रोपांची निवड*

गच्चीवरील बाग असणार्या सर्व बागप्रेमींना नमस्कार,
आजचा विषय आहे, नर्सरीमधुन रोपांची खरेदी करताना किंवा निवड करताना काय विशेष काळजी घ्यावी.
🍁नर्सरी मध्ये गेल्यावर सर्वप्रथम संपुर्ण परीसराची पाहणी करावी.रोपांची कंडीशन ,नर्सरीचा मेंटेनंस कसा आहे हे पहावे.त्यानंतरच खरेदीचा पुढचा प्रवास सुरु करावा.
🍁रोपं खरेदी करण्यापुर्वी तुमच्या मनात बागेविषयी ची कल्पना तयार असावी त्याप्रमाने झाडे निवडावी.कींवा झाडांबद्दल बेसिक माहीती हवी.जसे की इंडोर प्लांट कुठली ,आऊट डोअर प्लांट कुठली वैगेरे वैगेरे..जर नसेल माहीती तर नर्सरी वाल्यांना विचरावे व मार्गदर्शन घ्यावे.
🍁नीवडलेल्या रोपांची काळजी कशी घ्यावी हे माहीती असणे आवश्यक आहे जसे की, माती कशी लागते,पाणी कीती लागते,खत कोणते घालावे,कुंडी कोणती वापरावी.जर नसेल माहीत तर नर्सरि वाल्यांना विचारावे.
🍁सर्वात महत्वाचे रोप निवडताना त्यांना सर्व बाजुने पहावे,पानांच्या आतील बाजुस,फांद्या,कळ्या -फुल.
कीडींचा प्रादुर्भाव नसावा.कीड लागलेली नसावी,पाने पीवळी पडलेली नसावी.रोगटलेले रोप नसावे.
🍁रोपांची मुळे ही पॉली बॅगच्या कींवा कुंडीच्या ड्रेनेज होलमधुन बाहेर आलेली तसेच बाहेर येऊन जमीनीत मातीत गेलेली नसावित.तसली रोप कीतीही चांगली हेल्दी वाटत असली तरी खरेदी करु नये.कारण जर ती रोप जमीनीतुन उपटली तर मुळे तुटतात आणि घरी जाईपर्यंत कोमेजुन जातात.जर मुळे फक्त बाहेर आलेली असतील तर त्यांना ओल्या कपड्यात कींवा ओलापेपर गुंडाळुन घेउन जावे.
🍁जर तुम्ही कलमी फुलांची/फळांची निवड करत असाल तर कलमी भाग निट तपासुन पहावा.कलम केलेला भाग हा निट जोडलेला असावा.रुटस्टोक आणि कलम यांचा एकमेकांना असलेला जोड हा पक्का असावा.निघालेला तुटलेला नसावा.
🍁ज्या वरायटीचे कलमी रोप खरेदी करताय मग ते फळांचे असो वा फुलांचे त्या विषयी माहीती नर्सरी वाल्यांना नक्की विचरावे जसे की,कलम कोणता आहे,कोणती वरायटी आहे,फळ कधी येईल वैगेरे वैगेरे.
🍁कलमी झाडावर फळ/फुल लागले असेल तर त्याची पाहणी करावी.क्वॉलीटी चेक करावी.
🍁फुल झाडं खरेदी करत असाल तर कळ्या,फुल पहावी कीड,मुंगी नसावी.कळ्या लागलेली रोप निवडावीत.हीरवीगार पाने असलेली सुदृड रोपं निवडावीत.
🍁जर तुम्ही Bare Rooted (माती विरहीत असलेली) रोपं खरेदी करत असाल तर त्यांची मुळे ही ओल्या कागदात कींवा कापडात गुंडाळुन घेऊन जावे.
🍁कुंड्याची निवड,खते ही नर्सरी वाल्यांना विचारुन करावीत.रोपांच्या प्रकारांनुसार कुंड्या निवडाव्यात जसे की हँगीग,वर्टीकल,स्टँडींग रोपांच्या वरायटी नुसार खरेदी करावे.

*आपलीच बागप्रेमी*
Nutan Amit Mathure
*HoneyRoots Garden Care Services,Pune*

20/12/2025

#बागकाम_एक_कला
*भाग - १ :- बागकामाची सुरुवात*
बागकामाला सुरुवात करण्याआधी पुढील गोष्टी सर्व प्रथम माहीत करुन घेणे गरजेचे आहे.
🍁 पहीले कोणत्या रोपाला कसे वातावरण लागते,ऊन कसे हवे,पाणी कीती प्रमाणात हवे या सर्व गोष्टी माहीती करुन घेणे तसेच त्यांची नावे माहीत करुन घेणे यामुळे नर्सरीतुन रोपे आणन्यास मदत होईल.
🍁 कुंडीसाठी माती ही व्यवस्थित सर्व गुणांनी संपन्न असावी.माती तयार कशी करावी या विषयी माहीती करुन घेणे.माती कधी व कीती महीन्यांनी बदलायची याबद्दल माहीती करुन घेणे.
🍁 रोपांची छाटनी ही कशी व कधी करावी या बद्दल माहीती करुन घेणे.
🍁 सर्वात महत्वाचे म्हणजे बागकामांत वापरली जाणारी अवजारे हे माहीत असणे व जवळ असणे गरजेचे आहे.तसेच ते स्वच्छ व साफ ठेवणे गरजेचे आहे.
🍁 आपल्याला कश्याप्रकारची बाग कींवा कश्याप्रकारची रोप हवीय आपल्या बागेत यांची मनात प्रिप्लँनिंग केलीली असावी,म्हणजे त्यानुसार तयारी करायला सोप्पे जाते.त्यानुसार कुंडी ठरवावी.
🍁 उन्हाळा,हीवाळा,पावसाळा या ऋतुंमध्ये बागेची काळजी कशी घेता येईल या बद्दल प्रिप्लॅनिंग करुन ठेवावे,म्हणजे ऐन वेळी होणारे नुकसान टाळता येते.
🍁 बागकाम करताना आपल्या घराजवळचे वातावरण सहन करुन घेणारी म्हणजेच उन जास्त असेल तर उनात वाढणारी,सावली जास्त असेल तर सावलीत वाढणारी,मिश्र वातावरण असेल तर दोन्ही वातावरणात वाढणारी रोपे झाडे लावावी.यामुळे बाग सजवणे फुलवणे सोप्पे होईल.
🍁 आपण दररोज जेवण करतो कारण आपल्याला भुक लागते,आपल्या शरीराला पोषक घटक हवे असतात तसेच झाडांना देखील भुक लागते पोषक घटक हवे असतात त्यामुळे कुंडीत लावलेल्या झाडांना नियमित पणे खत,पोषक घटक अन्नद्रव्ये देते गरजेचे असते.कारण कुंडीत लावलेल्या झाडांची मुळे ही कमी जागेत आतल्याआतच फीरत असतात आणि कालांतराने कुंडीतल्या मातीतले घटक अन्नद्रव्ये संपुन जातात त्यामुळे वेळोवेळी याची पुर्तता आपल्याला करावी लागते.
🍁 झाडांना खत,पाणी,औषधे देण्याचा जर टाईमटेबल बनवला तर बाग मेंटेन ठेवायला मदत होते.
🍁 बागेमध्ये एका कोपर्यात खत बनवण्यासाठी एक सेटअप करावा, जेने करुन आपल्या घरातील ओल्या व सुक्या विघटन होणार्या कचर्याचे नियोजन करण्यास मदत होईल.आणि आपल्या बागेसाठी सुंदर असे खत तयार होईल.

तर मंडळी आज पासुन बागकाम एक कला या माझ्या लेखणीतुन रोज नवनविन माहीतींचा खजिना आपल्या सर्वांसोबत शेअर करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करत आहे.
आजचा हा पहीला भाग कसा
वाटला या बद्दल नक्की कंमेंट द्वारे
कळवा.

*आपलीच बागप्रेमी*
Nutan Amit Mathure

07/01/2025
कामासाठी माळी कामगार हवे आहेत.072194 50493
16/07/2024

कामासाठी माळी कामगार हवे आहेत.
072194 50493

HoneyRoots Garden Care Services,Pune We made your dream garden blossom.😍😍🍓🍓🍒🍒🍎🍎🍉🍑🍊🍑🍊🥭🍋🍈🍌🍊🍊🍓🍍🍍🍓🍊🍊🍐🫐🫐🍓🍇🥥🍓🥥🍇🌰🥔🧄🍆🥬🫛🫑🍆🥜🥜🥜We c...
06/01/2024

HoneyRoots Garden Care Services,Pune
We made your dream garden blossom.😍😍🍓🍓🍒🍒🍎🍎🍉🍑🍊🍑🍊🥭🍋🍈🍌🍊🍊🍓🍍🍍🍓🍊🍊🍐🫐🫐🍓🍇🥥🍓🥥🍇🌰🥔🧄🍆🥬🫛🫑🍆🥜🥜🥜
We can make your garden exactly as you want it in a very low budget.
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🏡🏡🏡🏡🪴🪴🪴

Contact us now for your garden set up
📞 7219450493

HoneyRoots Garden Care Services,Pune         Hello everyone.बोन्साय बनवायची इच्छा आहे..!!पण माहित नाही कसे बनवायचे..? चल...
05/01/2024

HoneyRoots Garden Care Services,Pune





Hello everyone.
बोन्साय बनवायची इच्छा आहे..!!
पण माहित नाही कसे बनवायचे..?
चला तर मग आम्ही घेऊन आलो आहे
खास बोन्साय नवशिख्यांसाठी १२ दिवसांची संपूर्ण माहिती सह कार्यशाळा.
आपल्या बोन्साय कार्यशाळेचा अभ्यासक्र पुढील प्रमाणे आहे.
कार्यशाळेत काय काय शिकवले जाणार आहे याची लिस्ट आणि अभ्यासक्रम दिलेला आहे.

बेसिक बोन्साय कार्यशाळा असणार आहे परंतु त्यात सर्व एकुणएक महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहे.
थेरी आणि प्रात्यक्षिक असे दोन्ही सेशन सहित
सर्व बारकावे या कार्यशाळेत घेतले जाणार आहे.

कालावधी १२ दिवस असणार आहे.
स्थळ - सिंहगड रोड, पुणे
दिनांक १० जानेवारी २०२४ पासून सुरू.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ७२१९४५०४९३
आत्ताच आपले नाव नोंदवा.

🎍 🎍
📝

1) History of Bonsai Art

2) Bonsai Care
° keeping Bonsai Indoor
° keeping Bonsai Outdoor
° Fertilizer
° Repotting
° Care Examination

🖍️ Potting mixture making
🖍️ Types of Potting mixture
🖍️plant maintenance

3)Bonsai Techniques
° Bonsai Tools
° Pruning Techniques
° Wiring Techniques
° Styling Examination

🖍️ Grafting Skill
🖍️Tools Handling and care

4) Make a Bonsai
° selection of material

🖍️ Plants selection
🖍️ Pots selection
🖍️ Soil selection
🖍️ Fertilizer selection

5) Bonsai Styles And Structure

6) Display and maintenance

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917219450493

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HoneyRoots Garden Care Services,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HoneyRoots Garden Care Services,Pune:

Share