Mandake Ladoowale

Mandake Ladoowale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mandake Ladoowale, Kitchen/Cooking, Ideal Park, Gokulnagar, Katraj Kondhwa Road, Pune.

विनम्र अभिवादन 🙏
14/04/2026

विनम्र अभिवादन 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
13/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

पुस्तक समीक्षा ब्रँड काटदरे  (लेखिका : अपर्णा वेलणकर प्रकाशक : रोहन प्रकाशन )साधारण पाचवी सहावीत असताना वडिलांनी मला ‘कर...
11/04/2026

पुस्तक समीक्षा
ब्रँड काटदरे
(लेखिका : अपर्णा वेलणकर प्रकाशक : रोहन प्रकाशन )
साधारण पाचवी सहावीत असताना वडिलांनी मला ‘कर्म चाले संगती’ नावाचे गजाननराव पेंढरकर (त्यावेळचे विको लॅबोरेटरी कंपनीचे प्रमुख) यांचे आत्मचरित्र वाचायला दिले. या एका पुस्तकाने अक्षरशः आयुष्याची दिशा बदलली.

फार कमी पुस्तके अशी असतात की जी एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवताच येत नाही. नुकतेच वाचनात आलेले अपर्णा वेलणकर लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित ‘ब्रँड काटदरे’ नावाचे हे पुस्तक अशाच सदरात मोडते.

खरं तर हे पुस्तक म्हणजे मागील तीन पिढ्यांच्या प्रवासाचे वर्णन आहे. बाळकृष्ण काटदरे हे आयुष्याच्या अतिशय अवघड आणि निर्णायकी टप्प्यावर पोहोचले असतानाच्या प्रसंगाने या पुस्तकाची सुरुवात होते. या पुस्तकाचे कालावधीनुसार भाग करायचे झाले तर साधारणपणे 1958 ते 1972 पर्यंतचा उद्योग तगवून ठेवण्याचा पहिला टप्पा; 1972 ते 1992 सालापर्यंतचा गृह उद्योग म्हणून स्थिरावण्याचा टप्पा ;1992 च्या उदारीकरणानंतरचा झपाट्याने यांत्रिकीकरणाकडे वळण्याचा प्रवास आणि त्यानंतर 2010 सालानंतरचा आधुनिकीकरणाचा आणि एका लघु उद्योगाला राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठीचा चाललेला प्रयत्न अशी ढोबळमानाने चार टप्प्यात विभागणी करता येईल.

सुमारे सहा दशकापूर्वी साताऱ्या जवळच्या मसूर या गावातून या गोष्टीची सुरुवात होते. त्या काळात उद्योगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन घरातल्या कलहाला कंटाळून बाळकृष्ण काटदरे यांनी धरलेली साताऱ्याची वाट; साताऱ्यात आल्यावर देखील अडचणींनी न सोडलेला पिच्छा; त्यांच्या सौभाग्यवती प्रमिलाबाई काटदरे यांनी पहाडासारखे त्यांच्या मागे उभे राहून दिलेली साथ वाचताना नकळत डोळ्याच्या कडा पाणावून पुस्तकातले शब्द धूसर होतात. त्या वेळेची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता सध्या आपल्यापुढे असणारी आव्हाने काहीच नाही याची जाणीव देखील होते.
त्यानंतर दुसरी पिढी अनिल काटदरे यांनी वडिलांनी लावलेल्या या छोट्याश्या उद्योगरुपी रोपट्याला सांभाळताना आणि वाढवताना केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. त्यांना थोरल्या वहिनी म्हणजेच त्यांच्या सौभाग्यवती शैलाजा काटदरे यांनी दिलेली साथ वर्णन करण्यात आले आहे. शैलजा काटदरे यांनी केवळ मागील पिढीकडून आलेले मसाले बनवत राहण्यापेक्षा त्यामध्ये स्वतःच्या पाककौशल्याची जोड देऊन आणखी नवीन उत्पादने बाजारात आणली. कांडप करताना कुटल्या जाणाऱ्या मसाल्याच्या आवाजावरून आणि मसाला भाजण्याच्या वासावरून अंदाज घेण्याचे त्यांचे कौशल्य वाचून थक्क व्हायला होते.
साधारणपणे असे म्हणतात की दोन पिढ्या झाल्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये तोच व्यवसाय चालू राहण्याची शक्यता ही 30 टक्क्यापर्यंत खाली घसरते . पण काटदऱ्यांच्या बाबतीत मात्र हा व्यवसाय नुसता टिकलाच नाही तर तिसऱ्या पिढीने हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढवला. पराग आणि दीपा काटदरे यांनी आपल्या व्यवसाय कौशल्याने या पारंपारिक व्यवसायाला एका मोठ्या उद्योगसमूहात रूपांतरित केले. परंतु हे करताना सगळ्यात महत्त्वाचा असलेला व्यवसायाचा आत्मा म्हणजेच पारंपरिक चव आणि माणसे जपून ठेवण्यासाठी त्यांना काय तारेवरची कसरत करावी लागली याचे वर्णन या पुस्तकात आहे. या पुस्तकामध्ये आणखी एक आवडलेली बाब म्हणजे या तीन पिढ्यांच्या प्रवासाचे वर्णन करताना कुटुंबात असलेल्या महिलांच्या व्यावसायिक सहभागाचा देखील तितक्याच विस्तृतपणे उल्लेख करण्यात आला आहे. कुटुंबातल्या महिलांनी वेळोवेळी घेतलेले कठोर निर्णय आणि त्यामुळे व्यवसायाला मिळालेली कलाटणी यांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आढळते.

आज कंपनी स्थापन केली रे केली की युनिकॉर्न क्लब मध्ये आपला स्टार्टअप गेल्याची स्वप्ने व्यवसायिकाला पडतात. अर्थात यामध्ये गैर काहीच नाही परंतु पाया डळमळीत राहिल्यास असे क्लब धूमकेतू सारखे नाहीसे होण्याची देखील शक्यता असते. अशावेळी ध्रुवताऱ्यासारखे व्यावसायिकतेच्या अवकाशात अढळ स्थान मिळवायचे असेल तर प्रत्येक तरुण मराठी व्यावसायिकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेच पाहिजे.

प्रीतम मांडके
पार्टनर, मांडके फूड्स एल एल पी, पुणे

02/04/2026

27/03/2026

Watch this video only if you want to solve your business issues as you grow & as it becomes more & more complex by the day!In this video, our pretiguos custo...

26/03/2026

26/03/2026

19/03/2026

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

19/03/2026

19/03/2026

Address

Ideal Park, Gokulnagar, Katraj Kondhwa Road
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mandake Ladoowale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mandake Ladoowale:

Share