Perfect Construction and Painting

Perfect Construction and Painting We provide different home improvement services such as Building Painting, Water Proofing, and different designer tiles whatsapp:7798673034

Perfect Construction Painting provides different home improvement services such as construction, interior, Buiding Painting, and waterproofing, and Designer tiles

20/09/2017

हर हर महादेव

18/09/2017

गुरू मूर्ती गती चंद्रमा, सेवक नैन चकोर |
आठ पहर निरखता रहे, गुरू मूर्ती की ओर ||

13/09/2017

ॐ ओमकारा गुरुदेव दत्त
सद्गुरू रामचंद्र महाराज की जय
सद्गुरु ॐ स्वामी महाराज की जय

GurucharitrA

अध्याय एकोणतिसावा

भस्म माहात्म्य - ब्रम्हरराक्षसाचा उद्धार
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारकाने सिद्ध्योग्यांना विनंती केली, "पूर्वी त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरुंना भस्म माहात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी त्रिविक्रमभरतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रमभरतीला म्हणाले, मी तुला आता भस्म माहात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक.

पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृह व गृहिणी - विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंचवनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहानभुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रम्हराक्षस होता.

वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला, परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाही. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रम्हराक्षसाच्या अंगाला लागले त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान-भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, "स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा." वामदेवांनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? या अरण्यात का हिंडतोस ? " राक्षस म्हणाला, "स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पापपुण्यकर्मे मला चांगली आठवत आहेत."

वामदेव म्हणाले, "तुला पंचवीस जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर सांग पाहू, तू कोणकोणती पापे केलीस ?"

राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली. राक्षस म्हणाला, "पंचविसाव्या जन्मापूर्वी मी यवन राजा होतो. मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो. मी रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे. रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो. मी सधवा, विधवा, कुमारी, रजस्वला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला व त्यांच्याशी कुकर्म केले. अशारीतीने विषयभोगत आसक्त झालेल्या, मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी अनेक रोग झाले. मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. शेवटी, माझ्या कुक्रमाणे मला मृत्यू आला. जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते, त्याला अपयश येते. भाग्य क्षीण होते. तो अत्यंत दुर्गातीला जातो. त्याचे पितरसुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात. मृत्यूनंतर मला यमलोकात नेले. तेथे मला भयंकर अशा नरककुंडात टाकले. हजारो वर्षे मी तेथे पडून होतो. त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचे फळ म्हणून मला यमाने पिशाच योनीत जन्म दिला. हजारो वर्षे अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो.

यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो.तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, पाचव्यात सरडा झालो. सहाव्या जन्मी कुत्रा, सातव्या जन्मी कोल्हा, आठव्यात गवा, नवव्यात मी वानर झालो. तेराव्या जन्मी बगळा झालो, चौदाव्या जन्मी रानकोंबडा. त्यानंतर गिधाड. मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो. अठराव्या जन्मी मी कासव झालो. त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो. बाविसाव्या जन्मी मी रानहत्ती झालो. त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला. त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो. तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो. मी तुम्हाला पकडले, पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले. तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात. आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. या भस्माचे केवढे हे माहात्म्य !" त्यावर वामदेव म्हणाले, "माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे. भगवान शिवशंकर या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात, एवढा या भस्माचा मान आहे. याचे माहात्म्य विशेष ते काय सांगणार ? पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची तुला कल्पना येईल."

वामदेव कथा सांगू लागले, पूर्वी द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राम्हण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगांनी व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते. तो एका हीन जातीतील एका स्त्रीच्या नादी लागला. त्याने त्याच्याशी विवाह केला. तो इतर स्त्रियांशीसुद्धा व्यभिचार करीत असे. तो चोऱ्या करून पोट भरीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत.

यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले ? एक शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजाअर्चा करीत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मात लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राम्हणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राम्हणाच्या प्रेताला लागले. त्याचक्षणी तो ब्राम्हण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पहिले आणि त्यांनी त्या ब्राम्हणाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, "त्या ब्राम्हणाच्या कपाळी भस्म लागले होते. त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की, जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे. यमलोकांत नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की, "ज्यांनी जाणते-अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते." रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते." वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, "माझी पूर्वपुण्याई थोर म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राम्हणांच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती.माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्तने यमाकडे केली होती व 'पंचविसाव्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल' असे भविष्य वर्तविले होते. ते पुण्य आज फळाला आले. आता या भस्माचा विधी कसा करायचा, हे भस्म कसे लावावयाचे हे सर्व मला सांगा." राक्षसाने अशी विनंती केल असता वामदेव म्हणाले, ऐक.

पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदर पर्वतावर भगवान शंकर सर्व देव, ऋषी, यक्ष, किन्नर, विद्याधर यांच्यासमवेत बसले होते. त्यावेळी सनत्कुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, "पवित्र अशा गोमायाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्यांची राख करावी. तेच भस्म, नंतर ते शिवगायत्रीने (ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्) अभिमंत्रित करावे. त्यावेळी अग्निरीति भस्म. इत्यादी मंत्र म्हांवे. संद्योजात० या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे. मग ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबक० या मंत्राने भस्म भाळी लावावे. त्र्यायुषे० या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे. भस्म लावताना तर्जनी व करंगळी वापरू नये.

कपाळावर दोन बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जाळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रम्हहत्या, अभक्ष्यभक्षण इयादी महापातकेसुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात. भस्मधारक पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सर्व सुखे यांचा लाभ होतो. त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व त्याला मान देतात. शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो. तेथून ब्रम्ह्लोक व वैकुंठलोक येतेह अनंतकाळ वास्तव्य करून तो कैलासलोकी जातो. त्याला सायुज्यमुक्ती प्राप्त होते." भगवान शंकरांनी केलेले हे भस्मनिरुपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला.

हे भस्ममाहात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला. त्याने वामदेवांना विनंती केली, "स्वामी, माझा उद्धार करा." मग दयाघन वामदेवांनी त्या ब्रम्हराक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले. त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले. त्याचक्षणी त्याला दिव्यदेह प्राप्त झाला. मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लोकास गेला.

हे भस्ममाहात्म्य सांगून श्रीगुरूनृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीला म्हणाले, "वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते. जगाच्या उद्ध्रासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते. त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी सार्धम्य असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रम्हराक्षसाचा उद्धार झाला. म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे." हे ऐकून अतिशय आनंदित झालेले त्रिविक्रमभारती स्वस्थळी निघून गेले.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'भस्म माहात्म्य - ब्रम्हरराक्षसाचा उद्धार' नावाचा अध्याय एकोणतिसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

Ref : ( gurucharitra app https://play.google.com/store/apps/details?id=com.somnaths.gurucharitra.kathamrutsaar )

12/09/2017
Sundar
09/09/2017

Sundar

कसारा....,

House RenovationAfter paint, refinishing floors and installing built-ins, the room was ready for living.
22/08/2017

House Renovation

After paint, refinishing floors and installing built-ins, the room was ready for living.

RIGHT CHOICE                      Painting & Construction                                   PAINTING                    ...
17/08/2017

RIGHT CHOICE

Painting & Construction

PAINTING
REMODELING
ROOFING

To help guarantee protection of your property, we suggest that you utilize the Right Choice Painting& Construction Pre-painting checklist please choose your paint colors and contact us:9049497219 with your selection.

WHY PAINT??Going to market? Did you know that fresh paint is the quickest and most cost-effective way to increase your p...
12/08/2017

WHY PAINT??

Going to market? Did you know that fresh paint is the quickest and most cost-effective way to increase your property’s value? Paint can highlight features and, update dated works and significantly increase buyer appeal. Before going to market, you should assess and seriously consider the benefits and potential dividends of paint…..

"PAINT HOUSE"   To paint now? Or to paint later? That is the question. Find out if it's better to paint before or after ...
10/08/2017

"PAINT HOUSE"
To paint now? Or to paint later? That is the question. Find out if it's better to paint before or after you move into a new house.
Choose the COLOR for your Home...

Want to renovate or repair your home???Everyone knows home maintenance is important. It can extend the life of your home...
08/08/2017

Want to renovate or repair your home???

Everyone knows home maintenance is important. It can extend the life of your home’s systems and appliances and keep your home in good working order for many years to come.

"Please give us a few details so we can connect you with the  best experts."What is location of your project???         ...
05/08/2017

"Please give us a few details so we can connect you with the best experts."
What is location of your project???

PICK A PAINT COLOR....

Address

Kasba Peth
Pune
411011

Telephone

9049497219

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfect Construction and Painting posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Perfect Construction and Painting:

Share