29/01/2022
period.....
विश्रांतीचा काळ.....
🌳झाडांचा विश्रांतीचा काळ... आता तुम्हाला वाटेल झाडे पण विश्रांती करतात का... तर हो...ज्या झाडांना वर्षभर फुले येतात किंवा उन्हाळ्यात फुले येतात त्या झाडांचा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हा विश्रांतीचा काळ असतो.... आपण जसे आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस विश्रांती घेतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागतो तसेच झाडांना या काळात विश्रांती केली तर पुढे वर्षभर फुले देण्यासाठी ही झाडे तयार होत असतात.. तर झाडे विश्रांती करत आहे किंवा त्याचा Dormancy period चालू आहे हे कसे ओळखावे काही झाडांची पाने पिवळी पडून आपोआप पडू लागतात झाड आपल्या अंगावर एकही पान ठेवत नाही, काही झाडे तर अशी असतात की त्यांच्या फक्त वाळलेल्या फांद्या आपल्याला दिसतात अशावेळी त्यांचे हार्ड प्रूनिंग करू नये आपल्याला वाटते झाड आपले मरत आहे म्हणून आपण विनाकारण खत किंवा पाण्याचा मारा चालू ठेवतो..जेव्हा झाडांचा विश्रांतीचा काळ, dormancy period चालू असतो तेव्हा अशावेळी काय काय करावे व काय करू नये हे आपण पाहू या...
🌿खत: सर्वात महत्वाचे आपण जेव्हा झोपतो किंवा विश्रांती करतो तेव्हा आपण अन्न घेत नाही त्याचप्रमाणे झाडे जेव्हा विश्रांती करतात तेव्हा ती कुठल्याही प्रकारचे खत घेत नाहीत, त्याचे सर्व काम थांबलेले असते आपण विनाकारण झाडांना खत देत बसलो तर त्या खतांचा झाडांना काही उपयोग होत नाही ते खत तसेच मातीत पडून राहते विनाकारण खतामुळे उष्णता वाढून मुळे खराब होण्याची शक्यता असते... या काळात झाडांना ठोस खते देऊ नयेत जसे गांडूळ खत ,शेणखत अगदीच द्यायचे असेल तर द्रवरूप स्वरूपातील खते देऊ शकतो तेही अगदी कमी प्रमाणात.. विश्रांतीचा काळ चालू असतानाही तुम्ही झाडाला खत दिले तर ते आपले काम थोड्याफार प्रमाणात करत राहते त्यामुळे त्या झाडांना पूर्णपणे विश्रांती करता येत नाही व नंतर जेव्हा त्यांचा सिजन येतो तेव्हा ते भरपूर प्रमाणात फुले देऊ शकत नाहीत... झाडांना विश्रांती करण्यास मदत करा...
🍀पाणी: तसेही या दिवसात वातावरण थंड असल्यामुळे झाडांना दिलेले पाणी लवकर सुकत नाही माती ओली असतानाही विनाकारण जर आपण पाणी देत राहिलो तर झाडांच्या मुळा जवळ पाणी साठून, सतत ओलावा राहिला तर झाडांचीमुळे कुजण्याची शक्यता असते... झाड जगेल इतपतच पाणी या झाडांना द्यावे..
🌞सूर्यप्रकाश: थंड वातावरणामुळे या दिवसात जेवढे जास्तीत जास्त ऊन किंवा सूर्यप्रकाश देता येईल तेवढा द्यावा झाडे डायरेक्ट सूर्यप्रकाशात ठेवावी किंवा इंडोर प्लांट्स असतील तर जास्त अंधाऱ्या ठिकाणी न ठेवता ब्राईट लाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवावी...
🌱काही लोकांना झाडांना सकाळी सकाळी पाणी देण्याची सवय असते पण या दिवसात शक्यतो पाण्याचे तापमान सामान्य झाल्यानंतरच झाडांना पाणी द्यावे अतिशय थंड पाणी झाडांना मिळाल्यानंतर त्याच्या मुळांना थंडी वाजून झाड स्ट्रेस मध्ये जाऊ शकते.. थोडाफार सूर्यप्रकाश किंवा ऊन आल्यानंतरच झाडांना पाणी द्यावे... संध्याकाळच्या वेळी विनाकारण पाण्याचा फवारा झाडांच्या पानांवर करू नये.. कारण रात्री तापमान कमी असते त्यामुळे झाडांवरचे पाणी सुकत नाही अशावेळी झाडांच्या पानांना फंगस लावू शकतो किंवा रात्रीचे फिरणारे कीटक असतात त्यांना ओलावा मिळाल्यामुळे ते कीटक झाडांच्या पानावर हजारो अंडी देऊ शकतात.. म्हणून शक्यतो पाणी फवारण्याचे काम दिवसा करावे... थंडीच्या दिवसात शक्यतो पाणी फवारणी करू नये पण अगदीच गरज भासल्यास....
वातावरण जर खूपच थंड असेल तर झाडे जवळ जवळ एकत्र करून ठेवावे त्यामुळे थंड हवेचा फटका झाडांना बसणार नाही...
🪴अशाप्रकारे खत नाही, पाणी कमी प्रमाणात ,सूर्यप्रकाश भरपूर हे सर्व झाडांना उपलब्ध करून आपल्या झाडांना विश्रांती करण्यास मदत करा नंतर जेव्हा त्यांचा सीझन चालू होईल तेव्हा ते तुम्हाला भरभरून फुले देतील.. यात शंका नाही...