16/05/2026
‘16 मे’ जागतिक डेंग्यू दिन
जागतिक डेंग्यू दिन: डेंग्यूला हरवण्यासाठी स्वच्छतेची शपथ घेऊया;
साई पेस्ट कंन्ट्रोलचे जनजागृती आवाहन
श्रीरामपूर : दरवर्षी 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ साजरा केला जातो. पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा प्रसार होऊ नये आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने साई पेस्ट कंट्रोलच्या वतीने विशेष जनजागृती आवाहन करण्यात येत आहे. डेंग्यूमुक्त समाज घडवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी.
काय करावे आणि काय टाळावे?
डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने साठलेल्या स्वच्छ पाण्यात एडिस इजिप्ती डासांची पैदास झाल्यामुळे होतो. हे रोखण्यासाठी नागरिकांनी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:
* तपासा : आठवड्यातून किमान एकदा घरातील आणि परिसरातील सर्व पात्रे तपासा.
* स्वच्छ ठेवा : रांजण, टाक्या, कुंड्यांचे ट्रे नियमितपणे घासून स्वच्छ करा.
* झाकून ठेवा : पाण्याचे साठे घट्ट झाकणाने बंद ठेवा जेणेकरून डास त्यात शिरू शकणार नाहीत.
* साचलेले पाणी टाळा : जुने टायर, डबे, नारळाच्या करवंट्या किंवा रिकाम्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका.
* योग्य पेस्ट कंट्रोलची निवड करा
डेंग्यू नियंत्रणासाठी केवळ फवारणी पुरेशी नाही, तर ती शास्त्रोक्त पद्धतीने होणे गरजेचे आहे.
साई पेस्ट कंट्रोल निलेश परदेशी यांनी सांगितले की, डेंग्यू नियंत्रणासाठी नेहमी परवानाधारक आणि अधिकृत पेस्ट कंट्रोल ऑपरेटरचीच निवड करा. अनधिकृत व्यक्तींकडून किंवा घातक रसायनांचा वापर केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षित आणि प्रभावी उपचारांमुळेच आपण आपल्या कुटुंबाचे आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण करू शकतो.
या मोहिमेअंतर्गत ’तपासा, स्वच्छ ठेवा आणि झाकून ठेवा’ हा मंत्र घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सुरक्षित रहा, जबाबदार बना आणि डेंग्यूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सहकार्य करा, असे साई पेस्ट कंट्रोल कडून करण्यात आले आहे.🦟🦟🦟🦟