Manish Mantri

Manish Mantri शहराध्यक्ष, भाजपा वाशिम.🪷
|युवा जोश~क्रांती सोच|🚩

05/05/2026

Ladies and Gentlemen,

'Khela hobe' was their call. Bengal answered it right with a scoreboard. 🪷📊

Years of syndicate politics, cut-money whispers, and street power theatrics met voters who decided differently.

Syndicate vibes didn’t pass the vibe check. ❌

Good Governance did. 🔥

मनःपूर्वक धन्यवाद! 🙏दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या  #मनकीबात या कार्यक्रमाला वाशिम शहरातील १६ प्रभागांमध्ये उत...
05/05/2026

मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या #मनकीबात या कार्यक्रमाला वाशिम शहरातील १६ प्रभागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित या उपक्रमात नागरिक शांतचित्ताने देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जींचे विचार ऐकतात, ही खूप समाधानाची बाब आहे.

या कार्यक्रमाचे वृत्त आपल्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करून जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या वाशिममधील सर्व #पत्रकार बांधवांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सहकार्यामुळेच या उपक्रमाला अधिक बळ मिळत आहे आणि पुढील कार्यक्रम अधिक प्रभावीपणे घेण्यास प्रेरणा मिळते.

आपले सहकार्य असेच कायम राहो, ही अपेक्षा! 🙏



#युवा_जोश_क्रांती_सोच

🪷 पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा भव्य विजय! 🌸हा विजय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या...
05/05/2026

🪷 पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा भव्य विजय! 🌸
हा विजय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि अमित शाह यांच्या रणनीतीवर जनतेने दाखवलेला दृढ विश्वास आहे.
सर्व कार्यकर्ते व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏

🪷 पश्चिम बंगाल, असम और पुडुचेरी विधानसभा चुनावों में भारतीय जनता पार्टी की शानदार जीत! 🌸
यह जीत नरेंद्र मोदी जी के मजबूत नेतृत्व और अमित शाह जी की रणनीति पर जनता के अटूट विश्वास का प्रमाण है।
सभी कार्यकर्ताओं और मतदाताओं को हार्दिक बधाई! 🙏

🪷 A resounding victory for the Bharatiya Janata Party in the West Bengal, Assam, and Puducherry Assembly elections! 🌸
This triumph reflects the strong leadership of Narendra Modi and the strategic vision of Amit Shah, along with the unwavering trust of the people.
Congratulations to all party workers and supporters! 🙏



#युवा_जोश_क्रांती_सोच

वाशिममध्ये भाजपकडून निवडणूक निकालानिमित्त जल्लोष 🎉पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये पश्चिम बंगाल, पाँडिचेरी व आसाम ये...
04/05/2026

वाशिममध्ये भाजपकडून निवडणूक निकालानिमित्त जल्लोष 🎉

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये पश्चिम बंगाल, पाँडिचेरी व आसाम येथे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर वाशिम शहरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात #जल्लोष साजरा केला. आतषबाजी, ढोल-ताशे व मिठाई वाटप करत आनंद व्यक्त करण्यात आला.

देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी, गृहराज्यमंत्री श्री अमितजी शहा(चाणक्य) व पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व श्री नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच भारतीय जनता पक्ष मधील सर्वोच्च स्थान म्हणजेच आदरणीय स्व श्री श्यामाप्रसादजी मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधून सुरू केलेल्या पक्षाच्या विचारधारेचा विस्तार आज अधिक मजबूत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला मतदार संघाचे विकास पुरुष आमदार श्री श्याम भाऊ खोडे, वाशिमचे नगराध्यक्ष श्री अनिलजी केंदळे, पक्षाचे नेते श्री राजू राजे पाटील, तालुका अध्यक्ष श्री एकनाथ कड पाटील व जिल्हा शहर ग्रामीण भागातील महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

04/05/2026

The largest-ever Census is underway.
Do take part in it.
This time it is digital.

-Narendra Modi



#युवा_जोश_क्रांती_सोच

मौ. टणका येथील आमचे मित्र संजयजी गव्हाणे यांची कन्याचि. सौ. का. रश्मी यांचा शुभविवाह श्री परसराम यांच्यासोबत संपन्न झाला...
03/05/2026

मौ. टणका येथील आमचे मित्र संजयजी गव्हाणे यांची कन्या
चि. सौ. का. रश्मी यांचा शुभविवाह श्री परसराम यांच्यासोबत संपन्न झाला.

या #शुभविवाह_सोहळ्यास माझे सहकारी मित्र, सरपंच श्री शरदजी गोदारा, तलाठी वाशिम श्री नप्ते साहेब यांच्या सोबत उपस्थित राहण्याचा योग आला.

या मंगल प्रसंगी नवदाम्पत्यास पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


#युवा_जोश_क्रांती_सोच

माझे मित्र अंबादासजी कालापाड यांच्या निमित्ताने पारडी आसरा येथील पाटणकर परिवाराच्या  #शुभविवाह_सोहळ्यास सहकारी मित्र जिल...
03/05/2026

माझे मित्र अंबादासजी कालापाड यांच्या निमित्ताने पारडी आसरा येथील पाटणकर परिवाराच्या #शुभविवाह_सोहळ्यास सहकारी मित्र जिल्हा परिषद सदस्य दिगंबरजी खोरणे सोबत उपस्थित राहण्याचा आनंद लाभला.

या मंगल प्रसंगी रेणुका मातेचे दर्शन घेण्याचे सौभाग्यही लाभले, ही खरोखरच समाधानाची आणि आनंदाची क्षण ठरले. 🙏

नवविवाहित दाम्पत्यास पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

🙏

#युवा_जोश_क्रांती_सोच

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना  #पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. 🙏त्यांनी आपल्या ...
03/05/2026

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना #पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. 🙏

त्यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…! 🌸


#युवा_जोश_क्रांती_सोच

आचार्य गुरुवर्य श्री विजयकुमारजी दायमा महाराज यांच्या  #निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, संस्का...
03/05/2026

आचार्य गुरुवर्य श्री विजयकुमारजी दायमा महाराज यांच्या #निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, संस्कार आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा दिली.

त्यांचं कार्य केवळ एका शहरापुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या विचारांची आणि संस्कारांची छाप उमटली होती. त्यांचा विशाल गुरुपरिवार हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.

आज आपण एक महान मार्गदर्शक, आदर्श गुरु आणि प्रेरणास्थान गमावलं आहे.
त्यांच्या आठवणी आणि शिकवण आपल्या सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहतील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो, हीच विनम्र प्रार्थना. 🙏🕊️


#युवा_जोश_क्रांती_सोच

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📰लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मुक्त आणि निष्पक्ष पत्रकारितेचा स...
03/05/2026

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📰
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मुक्त आणि निष्पक्ष पत्रकारितेचा सन्मान करूया आणि सत्याच्या बाजूने उभे राहूया. 🙏

विश्व प्रेस स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं! 📰
लोकतंत्र के चौथे स्तंभ—स्वतंत्र और निष्पक्ष पत्रकारिता का सम्मान करें और सच्चाई के साथ खड़े रहें। 🙏

Warm wishes on World Press Freedom Day! 📰
Let us honor the role of free and fair journalism and stand firmly for truth and transparency. 🙏


#युवा_जोश_क्रांती_सोच

मौजे बोरी(मापारी) येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष माझे मित्र बंधु श्री संजूभाऊ मापारी यांच्या मुलीच्या  #शुभविवाह...
03/05/2026

मौजे बोरी(मापारी) येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष माझे मित्र बंधु श्री संजूभाऊ मापारी यांच्या मुलीच्या #शुभविवाह_सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.

लग्न समारंभ अत्यंत थाटात व सुंदर पद्धतीने पार पडला. उत्तम नियोजन, व्यवस्था आणि आनंदी वातावरणामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

नवविवाहित दांपत्याला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

03/05/2026

Address

जनसेवा कार्यालय, Mantri Arcade, Mantri Park
Washim
444505

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919422861698

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manish Mantri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manish Mantri:

Share